दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून काही नियमांचे पालन करा. तेव्हा निरोगी राहण्याची शक्यता वाढेल, आजाराचा धोका कमी होईल. जाणून घ्या हे १० नियम.
पुरेसे पाणी प्या: शरीराचे चयापचय व्यवस्थित राहण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया टिकून राहते. त्याचबरोबर दूषित पदार्थही शरीरातून बाहेर पडतात.
नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि हेल्थ चेकअप करा: नियमित तपासणी करून तुमची आरोग्याची स्थिती जाणून घ्या. येत्या काळात निरोगी राहणे अधिक सोपे होईल. कोणत्याही आजारावर त्वरीत नियंत्रण मिळविणे सुद्धा शक्य होणार आहे.
सामाजिक संपर्क वाढवा: लक्षात ठेवा, सामाजिक नातेसंबंध आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात. अशावेळी मित्रांशी नियमित संपर्क ठेवा. आनंदी रहा. यामुळे निरोगी राहण्याचा मार्ग सुकर होईल.
ध्यान आणि प्राणायाम: मेडिटेशन आणि प्राणायामाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढवता येते. प्रयत्न करून बघा. आयुष्यात शांतता असणं खूप गरजेचं आहे. प्राणायाम त्यासाठी मदत करू शकतो.
पुरेशी झोपः लक्षात ठेवा, निरोगी राहण्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. दररोज ७ ते ८ तास झोपणे खूप महत्वाचे आहे. हा नियम पाळा.
दररोज व्यायाम करा : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. यामुळे हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते. यामुळे शरीराची एकंदर स्थितीही सुधारते.
धूम्रपान सोडा: लक्षात ठेवा धूम्रपान केल्याने शरीराचे गंभीर नुकसान होते. केवळ फुफ्फुसच नव्हे, तर शरीराचे इतरही अनेक प्रकारचे नुकसान होते.
मध्यम मद्यपान: जास्त प्रमाणात मद्यपान करणे देखील शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. निरोगी राहणे सोपे जाईल.
संतुलित आहार: खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटने समृद्ध असलेले पदार्थ नियमित पणे खा. शरीर निरोगी राहील.