प्रदूषण जगात सर्वत्र पाहायला मिळतंय. प्रदुषणानं जगाचं अपरिमित नुकसान होतयं. आज आपण पाहूया सात असे उपाय ज्यानं प्रदुषणाला काही प्रमाणात कमी केलं जाऊ शकेल.

प्रदूषण ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. भारत प्रदूषणात एक नंबरवर आहे हे वारंवार पाहिलं गेलंय. भारतीय ऑटो इंडस्ट्रीजचे संचालक सुयश गुप्ता यांना हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलताना वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. भारताने देशातली एक मजबूत अर्थव्यवस्था असं नाव कमावत असतानाच सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश असाही नकारात्मक लौकीक आपल्या नावावर केलाय असं गुप्ता म्हणालेत
(Image by Robert Jones from Pixabay)भारतात प्रदुषणाचा विळखा पसरलेला पाहायला मिळतोय. वाढत्या वाहनांच्या संख्येनं यात आणखीनच भर पडल्याचं चित्र आहे. मात्र याच प्रदुषणाला कमी करता येऊ शकतं. याबाबत त्या कोणत्या सात उपाययोजना आहेत ज्या राबवल्या जाऊ शकतात सांगतायत सुयश गुप्ता.
(Image by Aksh Kinjawadekar from Pixabay )1. कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारी वाहनं वापरणं हा सर्वात उत्तम उपाय असल्याचं गुप्ता म्हणतायत. भारतीय वाहातूक वातावरणात १३.५ टक्के कार्बन डाय ऑक्साईड सोडते असं गुप्ता म्हणतायत.
(Gabriela Palai)2. भारतीय रेल्वेनं आपलं जाळं जास्तीत जास्त विणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातही त्या गाड्या इलेक्ट्रिक असाव्यात. यानं प्रवाशांची वाहतूक जास्त प्रमाणावर केली जाऊ शकेल आणि रस्त्यावरच्या वाहतुकीला आळा बसेल.
(JJ Jordan)3. नियोजनबद्ध शहरांचा विकास करणे हे आणखी एक मुख्य ध्येय भारतासमोर असावं असं गुप्ता म्हणतात. ही शहरं वसवताना तिथं दळणवळणाची साधनं कमीत कमी असावीत, तिथं नोकऱ्यांच्या संधी, घरं, अन्य महत्वाच्या गोष्टी अगदी जवळ असाव्यात.
(Francesco Ungaro)4. जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या वाहनांबरोबरच अशा पेट्रोलियम पदार्थांनाही बंदी घातली गेली पाहिजे जे पदार्थ सर्वात जास्त कार्बन उत्सर्जनास जबाबदार असतील.
(Inline Media)5. खासकरुन दिल्लीत रेल्वेची रोल ऑन रोल ऑफ ही सेवा वाढवली गेली पाहिजे. दिल्लीत प्रदुषणाचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं.रेल्वेच्या वाघीणीतून मोठे ट्रक नेता आले पाहिजेत. त्याचसोबत स्मार्ट सिग्नल यंत्रणाही रस्त्यांवर उभ्या केल्या गेल्या पाहिजेत.
(Twitter/KonkanRailway)6. गुजरातच्या धर्तीवर कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरांबाबत,उत्सर्जनाबाबत एक ठोस भूमिका घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्रदुषण प्रमाणात कसं राखता येईल यावर विचार होणं गरजेच आहे.
(Tima Miroshnichenko)





