D Gukesh Net Worth : भारताच्या डोम्माराजू गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला. तो सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे.
(1 / 4)
डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेन याचा पराभव करून जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तो सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन आणि विश्वनाथन आनंद याच्यानंतर दुसरा भारतीय चॅम्पियन बनला आहे.(D Gukesh Instagram)
(2 / 4)
डी गुकेशच्या आधी १९८५ मध्ये रशियाच्या गॅरी कास्परोव्ह याने वयाच्या २२व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती. डी गुकेशने अंतिम फेरीत चीनच्या डिंग लिरेनचा ७.५-६.५ असा पराभव केला.
(3 / 4)
तर यापूर्वी विश्वनाथन आनंद याने भारतासाठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. २०१२ मध्ये तो वर्ल्ड चेस चॅम्पियन बनला होता. गुकेशने वयाच्या १७व्या वर्षी FIDE कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती.
(4 / 4)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डी गुकेश याला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी ११ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. डी गुकेशची एकूण संपत्ती ८.२६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. पण आता यात आता मोठी वाढ होणार आहे.
(5 / 4)
डी गुकेश याचा जन्म २९ मे २००६ रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या ७ व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले आहे. गुकेशचे वडील डॉक्टर आणि आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.