World Breastfeeding Week 2022: बाळाच्या पोषण आणि वाढीसाठी आईचे दूध आवश्यक आहे. मात्र यावेळी मातांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. स्तनपान करताना कोणतेही अन्न खाऊ नका. आहाराची विशेष काळजी घ्या.
(1 / 10)
स्तनपान हा मातृत्व अनुभवाचा अविभाज्य भाग आहे. पण प्रत्येक नवीन आईला या टप्प्यावर काय खावे आणि काय खाऊ नये असे अनेक प्रश्न असतात. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत याविषयी जागरूकता आणि गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे. याबाबत एचटी लाईफस्टाईलशी बोलताना अमेय कनाकिया म्हणाले की, या काळात काही पदार्थ खाऊ नयेत. परंतु हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आईच्या शरीराला सर्व पोषक तत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे आहाराबाबत जागरूक राहा.(Photo by Bia Octavia on Unsplash)
(2 / 10)
यावेळी हिरव्या भाज्या अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ते लोह आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करते आणि माता हेल्दी राहतात. मेथी, लसूण, नारळ आणि ओटमील इत्यादी पदार्थांचेही सेवन करावे. कारण ते दूध उत्पादन वाढवतात. याशिवाय डॉक्टर तुमच्या आहाराबाबत काय सांगताय, यावर एक नजर टाकूया.(Unsplash)
(3 / 10)
१. पालक: यामध्ये कॅल्शियम, फायबर, अँटि ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे ए, के, ई आणि सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याला सुपरफूड मानले जाते. वरण किंवा सूपसोबत खा. त्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होईल.(Unsplash)
(4 / 10)
२. कडधान्ये आणि धान्ये: ते फायबर आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असतात. हरभरा, राजमा, अल्फल्फा आणि बीन्सचा आहारात समावेश करा. पोळी किंवा भातासोबत खा. कडधान्ये नियमित खा. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.(Vidya Subramanian /Hindustan Times)
(5 / 10)
३. समुद्री मासे: सॅल्मनसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. जन्म दिल्यानंतर आईच्या शरीराला भरपूर पोषक तत्वांची गरज असते. शिवाय शरीराला पूर्वीच्या जागी आणण्यासाठी असे मासे खाणे चांगले आहे. तसेच ते आईच्या दुधाचे प्रमाण वाढवते. तुम्ही अंडी देखील खाऊ शकता. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि बी १२, रिबोफ्लेविन आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. ते समान फायदे देखील देतात.(Shutterstock)
(6 / 10)
४. ट्यूना, शार्क किंवा किंग मॅकरेल यांसारख्या पारा असलेले मासे टाळण्याचे देखील लक्षात ठेवा. ते यावेळी शरीराला हानी पोहोचवू शकतात.(Shutterstock)
(7 / 10)
५. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवतात, ज्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. ते आईच्या दुधाचे प्रमाण वाढविण्यात देखील मदत करतात. नारळाचे पाणी किंवा इतर हर्बल ड्रिंक यांसारखी पेये देखील आईच्या दुधाचा पुरवठा वाढवण्यास मदत करू शकतात. तसेच तुमचे शरीर ड्राय होण्यापासून रोखू शकतात.(Shutterstock)
(8 / 10)
६. यावेळी मद्य आणि कॉफीसारखे ड्रिंक्स टाळा. कारण जेव्हा ते आईच्या दुधासह बाळाच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यांना सहजासहजी बाहेर पडायचे नसते. परिणामी, मुलाला समस्या येऊ शकतात.(Unsplash)
(9 / 10)
७. व्होल ग्रेन (Whole grain) जसे तांदूळ, गहू, बाजरी हे अत्यंत पौष्टिक असतात. ते आईच्या शरीरातील उर्जेची पातळी राखण्यास मदत करतात. ते आईच्या दुधाच्या उत्पादनासाठी हार्मोन्सच्या स्रावमध्ये देखील मदत करतात.(Pixabay)
(10 / 10)
८. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट. यावेळी जंक फूड, जास्त तळलेले अन्न, जास्त तेल असलेले अन्न टाळा. यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात.(Shutterstock)