Womens Asia Cup 2024: भारतीय महिला आणि पाकिस्तानी महिला यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Womens Asia Cup 2024: भारतीय महिला आणि पाकिस्तानी महिला यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Womens Asia Cup 2024: भारतीय महिला आणि पाकिस्तानी महिला यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Womens Asia Cup 2024: भारतीय महिला आणि पाकिस्तानी महिला यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Jul 18, 2024 07:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • IND W vs PAK W Head To Head : आशिया चषक २०२४ च्या सामन्यापूर्वी महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
महिला आशिया चषक २०२४ ला उद्यापासून (१९ जुलै) सुरुवात होत आहे.  पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पुरुषांच्या टी-२० विश्वचषकापासून ते वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सपर्यंत भारत आणि पाकिस्तान एका महिन्यात तीन वेळा आमनेसामने आले आहेत. टी-२० विश्वचषक आणि लिजेंड्स लीगच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. 
twitterfacebook
share
(1 / 6)

भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये कधीही कसोटी सामना खेळलेला नाही. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र दोन्ही देश एकूण ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने एकतर्फी वर्चस्व दाखवले आहे. कारण भारतीय संघाने ११ सामने जिंकले आहेत. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने भारताला कधीही पराभूत केलेले नाही. या बाबतीत भारताचे यश १०० टक्के आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान १४ वेळा आमनेसामने आले आहेत. या बाबतीत समोरासमोरच्या लढतीत भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. १४ टी-२० सामन्यांपैकी भारताने ११ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने ३ सामने जिंकले आहेत. भारत ११-३ ने आघाडीवर आहे. 
twitterfacebook
share
(3 / 6)

२०१२ मध्ये श्रीलंकेतील गॉल येथे झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१६ मध्ये दिल्लीत झालेल्या टी-२०विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानच्या महिलांनी भारतीय संघाला पराभूत केले होते. पाकिस्तानने २०२२ मध्ये बांगलादेशमधील सिल्हेट येथे झालेल्या आशिया चषक सामन्यात भारताला पराभूत केले होते. महिला क्रिकेटमध्ये भारताला पाकिस्तानकडून कधीही पराभव पत्करावा लागला नाही.
twitterfacebook
share
(4 / 6)

२०२३ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला टी-२० सामना झाला होता. भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली. भारताने पाकिस्तानविरुद्धच्या मागील सात टी-२० सामन्यांपैकी केवळ एक सामना गमावला आहे. ती म्हणजे २०२२ च्या आशिया चषकात. साखळी सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत होऊनही भारत २०२२ मध्ये आशिया चॅम्पियन बनला होता.
twitterfacebook
share
(5 / 6)

महिला टी-२० आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान चार वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने २०२२ मध्ये भारताला पराभूत केले होते. मात्र भारताने २०१२, २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया चषकात पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे टी-२० आशिया चषकात भारत ३-१ ने आघाडीवर आहे. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज