प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोक त्यांच्या मित्रांना, कुटूंबाला आणि प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवतात आणि या ऐतिहासिक दिवसाची आठवण करतात. हे संदेश केवळ देशभक्तीच्या भावनेवरच लक्ष केंद्रित करत नाहीत तर ऐक्य आणि अखंडतेच्या संदेशास देखील प्रोत्साहन देतात. येथे आम्ही आपल्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे सर्वोत्कृष्ट शुभेच्छा संदेश आणले आहेत, जे आपण आपल्या लोकांना पाठवू शकता.
(freepik)उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
मोकळ्या आकाशात रंग भरू तीन
जगभर पसरवू रंग त्याग नी शौर्याचा
जगभर पसरवू रंग शांततेचा
जगभर पसरवू रंग समृद्धीचा,
करू नमन आपल्या तिरंग्याला,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले...
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला...
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!