जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. हिवाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टींचे सेवन करणेआवश्यक आहे.
लसूण - लसूणमध्ये नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आणि ऍलिसिन नावाचे कम्पाउंड असते जे संसर्गाशी लढण्यास मदत करते.
हळदीचे दूध- हळदीचे दूध हे सर्दी आणि फ्लूवर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. झटपट प्रभावासाठी तुम्ही काळी मिरी देखील घालू शकता.
बदाम- बदामामध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यामध्ये झिंक देखील असते, जे सर्दी आणि खोकल्यामध्ये फायदेशीर आहे.
आवळा - हे हंगामी फळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे, ज्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि अँटि ऑक्सिडंट गुणधर्म आहेत.