जगभरातील फोटोग्राफर्सनी टिपलेले वन्यप्राण्यांचे थक्क करणारे अदभूत फोटो पाहण्याची मुंबईकरांना संधी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जगभरातील फोटोग्राफर्सनी टिपलेले वन्यप्राण्यांचे थक्क करणारे अदभूत फोटो पाहण्याची मुंबईकरांना संधी

जगभरातील फोटोग्राफर्सनी टिपलेले वन्यप्राण्यांचे थक्क करणारे अदभूत फोटो पाहण्याची मुंबईकरांना संधी

जगभरातील फोटोग्राफर्सनी टिपलेले वन्यप्राण्यांचे थक्क करणारे अदभूत फोटो पाहण्याची मुंबईकरांना संधी

Nov 05, 2024 04:26 PM IST
  • twitter
  • twitter
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये आयोजित केले जाणारे ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ हे प्रदर्शन आता मुंबईकरांसाठी उपलब्ध झाले आहे. हे प्रदर्शन मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या आर्ट हाऊसमध्ये सुरू असून ५ जानेवारी २०२५ पर्यंत खुले राहणार आहे. 
केनियाच्या जंगलात या मादी बिबट्याला प्रेमाने ‘काबोसो’ असं म्हणतात. दुर्दैवाने ही मादी बिबट्या आता हयात नाही. हा फोटो क्लिक करण्यापूर्वी फोटोग्राफर दिवसभर या मादी बिबट्याच्या मागावर होता. जंगलात एके ठिकाणी फोटोग्राफर नदी ओलांडत असताना हा बिबट्या सुद्धा फोटोग्राफरसोबत उडी मारत नदी ओलांडत असल्याचे दिसले. फोटोग्राफरने पटकन कॅमेऱ्याच्या लेन्स बदलून या बिबट्याचा भव्य आकार छायाचित्रात असा कैद केला. 
twitterfacebook
share
(1 / 8)
केनियाच्या जंगलात या मादी बिबट्याला प्रेमाने ‘काबोसो’ असं म्हणतात. दुर्दैवाने ही मादी बिबट्या आता हयात नाही. हा फोटो क्लिक करण्यापूर्वी फोटोग्राफर दिवसभर या मादी बिबट्याच्या मागावर होता. जंगलात एके ठिकाणी फोटोग्राफर नदी ओलांडत असताना हा बिबट्या सुद्धा फोटोग्राफरसोबत उडी मारत नदी ओलांडत असल्याचे दिसले. फोटोग्राफरने पटकन कॅमेऱ्याच्या लेन्स बदलून या बिबट्याचा भव्य आकार छायाचित्रात असा कैद केला. (Photo: Shashwat Harish)
आफ्रिकेतील गॅबॉन या देशात लोपे नॅशनल पार्कमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने धडक दिल्यामुळे प्रचंड घाबरलेल्या हत्तीची अवस्था दर्शवणारा हा हृदयद्रावक फोटो. ट्रेनच्या धडकेमुळे हत्तीचे कुल्ले तुटले आणि नंतर तो मरण पावला. गॅबॉन हा सर्वाधिक मँगनिज निर्यात करणारा देश आहे. मानवी व्यवहाराच्या सोयीसाठी वन्यप्राण्यांच्या अधिवासात निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे प्राण्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांसमोरील दैनंदिन धोके अधोरेखित करणारा फोटो. 
twitterfacebook
share
(2 / 8)
आफ्रिकेतील गॅबॉन या देशात लोपे नॅशनल पार्कमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने धडक दिल्यामुळे प्रचंड घाबरलेल्या हत्तीची अवस्था दर्शवणारा हा हृदयद्रावक फोटो. ट्रेनच्या धडकेमुळे हत्तीचे कुल्ले तुटले आणि नंतर तो मरण पावला. गॅबॉन हा सर्वाधिक मँगनिज निर्यात करणारा देश आहे. मानवी व्यवहाराच्या सोयीसाठी वन्यप्राण्यांच्या अधिवासात निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे प्राण्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांसमोरील दैनंदिन धोके अधोरेखित करणारा फोटो. (Photo: Jasper Doest)
माकडाच्या पिल्लाची हरीणाच्या पाठीवर स्वारी. जपानच्या याकुशिमा बेटावर टिपलेले हे अदभूत आणि दुर्मिळ दृष्य. या दृष्यात नर माकड मादी हरीणीशी प्रणय करण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येते. जंगलात माकड आणि हरीणांमधील हे मैत्रीपूर्ण संबंध तसे नवे नाही. परंतु अशी दृष्य फार कमी पहायला मिळतात. 
twitterfacebook
share
(3 / 8)
माकडाच्या पिल्लाची हरीणाच्या पाठीवर स्वारी. जपानच्या याकुशिमा बेटावर टिपलेले हे अदभूत आणि दुर्मिळ दृष्य. या दृष्यात नर माकड मादी हरीणीशी प्रणय करण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येते. जंगलात माकड आणि हरीणांमधील हे मैत्रीपूर्ण संबंध तसे नवे नाही. परंतु अशी दृष्य फार कमी पहायला मिळतात. (Photo: Atsuyuki Ohshima)
सुंदर दिसणाऱ्या सोनेरी खेकड्याला (Horseshoe Crab) त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे आश्चर्यकारक अनुभव असतो. जगात भरमसाठ मासेमारीमुळे तसेच औषधनिर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी अनेक जलचर प्राणी अस्तंगत होण्याची भीती निर्माण झाली असून सोनेरी खेकडा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 
twitterfacebook
share
(4 / 8)
सुंदर दिसणाऱ्या सोनेरी खेकड्याला (Horseshoe Crab) त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे आश्चर्यकारक अनुभव असतो. जगात भरमसाठ मासेमारीमुळे तसेच औषधनिर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी अनेक जलचर प्राणी अस्तंगत होण्याची भीती निर्माण झाली असून सोनेरी खेकडा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. (Photo : Laurent Ballesta, France)
मानवी वस्त्या वाढत असल्यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूला दृष्टिपथात नसलेल्या रस्त्याच्या कडेला एका घरात या घुबडाच्या जोडीने आपले अधिवास कसे निर्माण केले आहे हे या छायाचित्राच्या माध्यमातून दिसून येते. जर वन्यजीव आपल्या वातावरणाशी जुळवून घेत असतील तर मानव त्यांचा आदर का करू शकत नाही?, असा सवाल निर्माण होतो. 
twitterfacebook
share
(5 / 8)
मानवी वस्त्या वाढत असल्यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूला दृष्टिपथात नसलेल्या रस्त्याच्या कडेला एका घरात या घुबडाच्या जोडीने आपले अधिवास कसे निर्माण केले आहे हे या छायाचित्राच्या माध्यमातून दिसून येते. जर वन्यजीव आपल्या वातावरणाशी जुळवून घेत असतील तर मानव त्यांचा आदर का करू शकत नाही?, असा सवाल निर्माण होतो. (Photo : Carmel Bechler)
पाण्याखाली निवांत बसलेली पाणघोड्याची जोडी. फोटोग्राफरने पाण्याखाली जाऊन या पाणघोड्याचे दुर्मिळ छायाचित्र शुट केले आहे. 
twitterfacebook
share
(6 / 8)
पाण्याखाली निवांत बसलेली पाणघोड्याची जोडी. फोटोग्राफरने पाण्याखाली जाऊन या पाणघोड्याचे दुर्मिळ छायाचित्र शुट केले आहे. (Photo: Mikhail Korostelev)
इस्रायलच्या वाळवंटात आढळणाऱ्या ‘न्यूबियन इबेक्स’ जातीच्या नर बोकडांमध्ये प्रणयाच्या हक्काच्या मुद्दावरून होणाऱ्या तुंबळ लढाईचा हा फोटो. वेगवेगळे ऋतू आणि ठिकाणांवर ‘न्यूबियन इबेक्स’ जातीच्या बोकडांचे जीवन याबद्दलच्या एका प्रकल्पावर हा फोटोग्राफर काम करतोय. सूर्योदयानंतर या भागात हा फोटोग्राफर फिरत असताना झिन दरी आणि पर्वताच्या पार्श्वभूमीवर एका कड्यावर सुरू असलेली लढाई कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी मिळाली.  
twitterfacebook
share
(7 / 8)
इस्रायलच्या वाळवंटात आढळणाऱ्या ‘न्यूबियन इबेक्स’ जातीच्या नर बोकडांमध्ये प्रणयाच्या हक्काच्या मुद्दावरून होणाऱ्या तुंबळ लढाईचा हा फोटो. वेगवेगळे ऋतू आणि ठिकाणांवर ‘न्यूबियन इबेक्स’ जातीच्या बोकडांचे जीवन याबद्दलच्या एका प्रकल्पावर हा फोटोग्राफर काम करतोय. सूर्योदयानंतर या भागात हा फोटोग्राफर फिरत असताना झिन दरी आणि पर्वताच्या पार्श्वभूमीवर एका कड्यावर सुरू असलेली लढाई कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी मिळाली.  (Photo: Amit Eshel)
इक्वाडोरमधील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या पोर्तो लोपेझ या छोट्या गावामधील हे चित्र आहे. यात एक मच्छीमार एका हातात एक लांब ताड मासा (sailfish) आणि दुसऱ्या हातात दुसऱ्या ताड माशाचे डोके बोटीत भरण्यासाठी ओढत घेऊन चालला आहे. नंतर हे मासे बोटीतून ट्रकमध्ये भरले जातात. हे चित्र दिसायला क्लेषदायक असले तरी या गावातील लोकांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे. 
twitterfacebook
share
(8 / 8)
इक्वाडोरमधील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या पोर्तो लोपेझ या छोट्या गावामधील हे चित्र आहे. यात एक मच्छीमार एका हातात एक लांब ताड मासा (sailfish) आणि दुसऱ्या हातात दुसऱ्या ताड माशाचे डोके बोटीत भरण्यासाठी ओढत घेऊन चालला आहे. नंतर हे मासे बोटीतून ट्रकमध्ये भरले जातात. हे चित्र दिसायला क्लेषदायक असले तरी या गावातील लोकांच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे स्त्रोत आहे. (Photo: Jef Pattyn)
इतर गॅलरीज