मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Oscar 2024: 'या' कारणामुळे ऑस्कर विजेत्यांची नावे शेवटपर्यंत ठेवली जातात गोपनीय

Oscar 2024: 'या' कारणामुळे ऑस्कर विजेत्यांची नावे शेवटपर्यंत ठेवली जातात गोपनीय

Mar 11, 2024 12:29 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Oscar Winners name: काही वर्षांपूर्वी ऑस्कर विजेत्यांची नावे आधीच जाहिर केली जायची. पण आता ती गूलदस्त्यात ठेवली जात असून ऐनवेळी घोषीत केली जातात. काय आहे कारण?

जगभरातील दिग्गजांचे लक्ष लागून राहिलेला ९६वा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये 'ओपेनहायमर' या चित्रपटाने ७ ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. पण हे सगळे पुरस्कार जेव्हा दिले जातात तेव्हा ती ऐन वेळी घोषित केले जातात. त्यामागे काय आहे कारण चला जाणून घेऊया..
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

आपण आजवर अनेक पुरस्कार सोहळे टीव्हीवर किंवा लाइव्ह पाहिले आहेत. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये मंचावर असणाऱ्या व्यक्तीचा हातात सीलबंद पाकीट असते. ती व्यक्ती ते पाकीट सर्वांसमोर फोडते आणि विजेत्याचे नाव घोषित करते. पण तोपर्यंत विजेत्याचे नाव हे गुपित ठेवले जाते. विजेत्याचे नाव ज्या कागदावर लिहिलेले असते तो कागद ठेवलेले पाकीट सीलबंद का असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया त्या मागचे कारण…
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

पहिला ऑस्कर सोहळा हा १९२९ साली पार पडला. पण या सोहळ्याची उत्सुकता मात्र कुणामध्ये पाहायला मिळाली नाही. त्याचं कारण म्हणजे विजेत्यांची नावे जवळपास तीन महिने आधीच घोषीत करण्यात आली होती. त्यानंतर दिग्दर्शक सेड्रिक गिब्जने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी शक्कल लढवली. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

विजेत्यांची नावे घोषीत करण्यापूर्वी पाच संभाव्य विजेत्यांची नावे जाहीर केली. त्याला आज आपण नॉमिनेशन असे म्हणतो. या पाच स्पर्धकांची जाहिरात करायची आणि पुरस्कार सोहळ्याची दिवशी विजेत्याचे नाव घोषित करायचे अशी कल्पना मांडली. (Photo by Robyn BECK / AFP)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

विजेत्यांची नावे घोषीत करण्यापूर्वी पाच संभाव्य विजेत्यांची नावे जाहीर केली. त्याला आज आपण नॉमिनेशन असे म्हणतो. या पाच स्पर्धकांची जाहिरात करायची आणि पुरस्कार सोहळ्याची दिवशी विजेत्याचे नाव घोषित करायचे अशी कल्पना मांडली. (Photo by Robyn BECK / AFP)(AFP)

ऑस्कर समितीच्या सर्व सभासदांना ती कल्पना आवडली देखील. त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची. जेणेकरून जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढेल. आता ही नावे पुरस्कार सोहळ्यातच जाहीर केली जातात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

ऑस्कर समितीच्या सर्व सभासदांना ती कल्पना आवडली देखील. त्यावेळी वृत्तमाध्यमांना आदल्या दिवशी रात्री ११ वाजता विजेत्यांच्या नावांची यादी दिली जायची. जेणेकरून जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढेल. आता ही नावे पुरस्कार सोहळ्यातच जाहीर केली जातात.(REUTERS)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज