६ ऑगस्ट २०२४ - गेली दोन-तीन महिने मणिपूर शांत असताना १ सप्टेंबरपासून येथे पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. मणिपूरमध्ये गेल्या दोन आठवड्यात ११ जण ठार झाले आहेत. ताज्या हिंसाचाराची सुरूवात ६ ऑगस्ट २०२४ रोजी व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपद्वारे झाली. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग यांच्या आवाजाशी मिळताजुळता आवाज या क्लिपमधून ऐकू येत असून एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध भडकवण्याची भाषा बोलली जात आहे. दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून ८ ऑगस्ट आणि २० ऑगस्ट असे दोन वेळा खुलासे करण्यात आले. ही क्लिप बनावट असून मणिपूरची शांतता पुन्हा भंग करण्यासाठी अशा क्लिप व्हायरल करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे होते.
(AP)१२ ऑगस्ट २०२४ - मणिपूर विधानससेचे अधिवेशन सुरू असताना १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आपण कुकी जमातीचा भाग असलेल्या थडू या जमातीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. मात्र थडू जमातीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रमुख संघटनेने या चर्चेवर आक्षेप घेत आमच्या संघटनेच्या सदस्यांचा समावेश नसलेली चर्चा बेकायदा असल्याचं जाहीर केलं.
(REUTERS)२७ ऑगस्ट २०२४ - थडू जमातीचे सदस्य असलेले मणिपूर भाजपचे प्रवक्ते टी मायकल लामझथांग होकिप यांच्या घरावर अज्ञात इसमांनी हल्ला केला. हा हल्ला म्हणजे मणिपूरची एकता आणि अखंडतेला दिलेलं आव्हान असल्याचं मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सांगितलं. या घटनेच्या एक आठवडानंतर होकिप यांच्या मूळ गावात असलेलं त्यांचं घर जाळण्यात आलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या मदतीने येत्या ५ ते ७ महिन्यांत मणिपूरमध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याचे मुख्यमंत्री सिंह यांनी जाहीर केले. कुकी आणि मैतई जमातींदरम्यान चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागा जमातीचे भाजप आमदार दिनगनग्लुंग गंगमेई यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक जाहीर केली.
(PTI)३१ ऑगस्ट २०२४ - मणिपूरमध्ये व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपचा विरोध आणि ‘कुकीलँड’साठी स्वतंत्र प्रशासकीय विभाग निर्माण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील कुकी जमातींकडून मणिपूरमध्ये तीन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
(AFP)१ सप्टेंबर २०२४ रोजी अतिरेक्यांनी ड्रोनचा वापर करत इम्फाळ (पश्चिम) जिल्ह्यातील काही गावांवर हवेतून खाली जमिनीवर स्फोटके सोडली. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले. दुसऱ्या दिवशी भारतीय राखीव पोलिस दलाच्या बंकरवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंकरचे बरेच नुकसान झाले होते.
(HT_PRINT)६ सप्टेंबर २०२४ - मणिपूरमध्ये बिष्णूपूर येथे काही संशयित अतिरेक्यांनी थेट रॉकेट हल्ल्या केला. मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री मैरेम्बाम कोयरेंग यांच्या बिष्णूपूर येथील घरावर एक रॉकेट कोसळून एक ७० वर्षीय वृद्ध ठार झाला तर ५ जण जखमी झाले होते. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना प्रथमच रॉकेटचा वापर करण्यात आला असून तब्बल ५ किमी लांब अंतरावरून हे रॉकेट सोडण्यात आले होते, असं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
(HT_PRINT)७ सप्टेंबर २०२४ रोजी मणिपूरमधील जिरीबाम या ठिकाणी दोन गटांत तुफान चकमक झाली होती. या चकमकीत ६ जण ठार झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेऊन परिस्थितीवर देखरेख करण्यास सुरूवात केली होती. मणिपूरमध्ये तैनात केंद्रीय पोलीस दलाचे ६० हजार जवान अतिरेक्यांच्या हिंसाचाराकडं मूकदर्शक म्हणून पाहत असून त्यांना माघारी बोलवावे असं पत्र भाजपचे आमदार आर के इमो सिंह, जे मुख्यमंत्र्यांचे जावई सुद्धा आहेत, यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं होतं. मणिपूरमध्ये तैनात केंद्रीय पोलीस पथकाचे नेतृत्व राज्य सरकारकडे द्यावे अशी मागणी करत विद्यार्थी इम्फाळमध्ये रस्त्यावर उतरले होते.
(PTI)
मे २०२३ मध्ये मणिपूर राज्यात उफाळलेल्या जातीय हिंसाचारात २५० पेक्षा जास्त माणसे ठार झाली होती. मणिपूरमधील मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी, असा आदेश मणिपूर हायकोर्टाने राज्य सरकारला दिला होता. हायकोर्टाच्या या आदेशाविरुद्ध कुकी जमातीच्या संघटनांनी मोर्चा काढला आणि दोन्ही समुदायात भयानक हिंसाचार झाला होता.
(AFP)