(1 / 7)बंगळुरू कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण पहिल्या डावात ते केवळ ४६ धावांत गारद झाले. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर न्यूझीलंडला ३५६ धावांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार पलटवार केला, पण पराभव टाळता आला नाही.