(2 / 4)देवी अन्नपूर्णा हे दुर्गेचेच एक रुप आहे. लग्न झाल्यावर सासरी जाताना आजही नववधूच्या हाती माहेरचीमंडळी देवी अन्नपूर्णेची लहान मूर्ती देतात. ही अन्नपूर्णा सासरच्या देवघरात ठेवली जाते. सासरी आलेल्या नववधूने सासरच्या लोकांना प्रेमाने खाऊ घालावं आणि त्या घरावर त्या मुलीच्या रुपात अन्नपूर्णेचा आशिर्वाद असावा अशी त्यामागची भावना असते.(फाइल फोटो, फेसबुक सौजन्याने)