मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  April Fool Day : जगात का साजरा केला जातो एक एप्रिलचा दिवस एप्रिल फूल डे, वाचा काही मनोरंजक गोष्टी

April Fool Day : जगात का साजरा केला जातो एक एप्रिलचा दिवस एप्रिल फूल डे, वाचा काही मनोरंजक गोष्टी

01 April 2023, 8:01 IST Dilip Ramchandra Vaze
01 April 2023, 8:01 IST

Stories Behind Celebrating First April As April Fool Day : जगभरात आजचा दिवस आपल्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना फूल बनवण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र हा दिवस जसा हटके आहे, तसेच या दिवसांचे ऐतिहासिक दाखलेही हटकेच आहेत. त्यातल्या काही हटके गोष्टी वाचा.

१ एप्रिल हा दिवस जगात एप्रिल फूल बवनण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. आपल्या मित्र मंडळींना फूल बनवून अर्थात त्यांची मजमस्करी करून त्यांच्यासोबत काही काळ आनंदात घालवण्याचा हा दिवस आहे. फूल बनवण्याच्या अनेक नव्यानव्या कृप्त्या शोधल्या जातात. मात्र १ एप्रिल अर्थात एप्रिल फूल डे साजरा करण्यामागचा इतिहास काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का. याबाबत विविध गोष्टीं सांगितल्या जातात. त्यातल्याच काही गोष्टी आज आपण पाहाणार आहोत.

(1 / 5)

साल १५६४ मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स नववा याने जाहीर केलं की फ्रान्समध्ये नवीन वर्ष १ जानेवारीपासून साजरं केलं जाईल. ख्रिश्चन देशांमध्ये त्यावेळेस नवं वर्ष इस्टरनंतर सुरू व्हायचं. इस्टर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपायचा. इस्टरचं कॅलेंडर चंद्राच्या हालचालींवर ठरवलं जायचं. त्यांची नववर्षाची तारीख निश्चित होत नसे. म्हणून सौर अर्थात सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे एक जानेवारीपासून नववर्ष साजरं केलं जाील असं ठरवण्यात आलं. फ्रेंच राजाच्या म्हणण्याप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरलं जाऊ लागलं. मात्र तरीही जे लोकं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नववर्ष साजरं करत होते, त्यांना एप्रिल फूल म्हटलं जाऊ लागलं. 

(2 / 5)

आणखी एक रंजक स्टोरीअसं म्हणतात की, १३८१ साली इंग्लंडचा राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी अॅनी यांच्या एंगेजमेंटची घोषणा 32 मार्चला रोजी करण्याचं ठरलं होतं. त्या देशात त्या अनुषंगाने उत्सव सुरू झाला. मात्र नंतर लोकांच्या लक्षात आलं की, ३२ मार्च ही तारीख कॅलेंडरमध्ये नाही. आपली फसवणूक झाल्याचं अनेकांच्या लक्षात आलं, मात्र तोवर उशीर झाला होता. कारण ते फूल बनवले गेले होते. तेव्हापासून ३१ मार्च नंतरचा दिवस म्हणजेच १ एप्रिल है दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो.

(3 / 5)

१९१५ साली एका ब्रिटीश पायलटने जर्मनीतील लिले विमानतळावर मोठा बॉम्ब फेकला.  लोकांनी तो बॉम्ब पडताना पाहिला आणि सर्वत्र एकच धावपळ उडाली. बॉम्बपासून वाचण्यासाठी लोकं बराच वेळ लपून राहिले. मात्र बॉम्ब फुटलाच नाही. मग काही धाडसी लोकांनी तो बॉम्ब का फुटला नाही हे पाहाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तो बॉम्ब नसून एक मोठा फुटबॉल असल्याचं दिसलं. त्यावर मोठ्या अक्षरात एप्रिल फूल असं लिहिलं होतं.

(4 / 5)

कॉन्सन्टाइन द ग्रेट या राजाच्या काळात काही विदुषकांनी राजाला आपण त्यांच्यापेक्षाही चांगला कारभार करू शकतो, हे दरबारात जाऊन सांगितलं. राजाला विनोदाची चांगली जाण होती. त्यामुळे राजाने त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि एक दिवस कारभार त्या विदुषकांच्या हाती दिला. तेव्हा विदुषकांनी एक फर्मान काढलं की, एक दिवस मूर्खासारखं वागायचं. तो दिवस एक एप्रिलचा होता. त्यामुळे तेव्हापासून एप्रिल फूल डे साजरा केला जातो.

(5 / 5)

इतर गॅलरीज