ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि टीम इंडियाचा जानी दुश्मन ट्रॅव्हिस हेड याची पत्नी सध्या चर्चेत आहे. अॅडलेड कसोटीत ती पतीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आली होती.
(Travis Head IG)टीम इंडियाचा जानी दुश्मन आणि ऑस्ट्रेलियाचा तुफानी फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने ॲडलेड कसोटीत शतक झळकावले. शतक पूर्ण केल्यानंतर त्याची पत्नी आपल्या मुलाला आपल्या कडेवर घेऊन आनंदाने उड्या मारताना दिसली.
ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे टीम इंडियाचा अडचणी वाढल्या आणि शेवटी पराभव स्विकारावा लागला.
ट्रॅव्हिस हेडच्या पत्नीचे नाव जेसिका डेव्हिस आहे, ती एक मॉडेल राहिली आहे आणि आता ती एक बिझनेस वुमन आहे.
जेसिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, इन्स्टाग्रामवर तिला २ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आयपीएलमध्ये ती सनरायझर्स हैदराबादला सपोर्ट करताना दिसली आहे. हेड SRH कडून आयपीएल खेळतो.
ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस यांचे १५ एप्रिल २०२३ रोजी लग्न झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.
मॉडेल असण्यासोबतच जेसिका बिझनेस देखील चालवते. जेसिकाचे सिडनी आणि कॅनबेरामध्ये अनेक हॉटेल्स आहेत.