ruturaj and utkarsha marriage : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षा पवारसोबत ३ ते ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. उत्कर्षा महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते.
(1 / 6)
चेन्नई सुपर किंग्जला IPL जिंकून दिल्यानंतर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
(2 / 6)
ऋतुराज त्याची गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत ३ आणि ४ जून दरम्यान लग्न करू शकतो. लग्नामुळे ऋतुराज गायकवाड WTC FINAL ला मुकणार आहे.
(3 / 6)
ऋतुराज WTC FINAL च्या राखीव खेळाडूंच्या यादीत होता, पण प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्या बदली खेळाडूची मागणी केली.
(4 / 6)
२४ वर्षीय उत्कर्षा पवार पुण्याची असून महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती मीडियम पेसर गोलंदाज आहे. उत्कर्षा २०२१ मध्ये महाराष्ट्राकडून लिस्ट A क्रिकेट खेळली आहे, पण त्यानंतर तिला संधी मिळाली नाही.
(5 / 6)
२४ वर्षीय उत्कर्षा पवार पुण्याची असून महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती मीडियम पेसर गोलंदाज आहे. उत्कर्षा २०२१ मध्ये महाराष्ट्राकडून लिस्ट A क्रिकेट खेळली आहे, पण त्यानंतर तिला संधी मिळाली नाही.
(6 / 6)
सोबतच उत्कर्षाने इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन अॅण्ड फिटनेस साइंसेस शिक्षण घेतलं आहे.