(1 / 6)हुरुन इंडियानं २०२४ साठीची श्रीमंतांची यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीत २२० व्यक्तींची भर पडली असून अब्जाधीशांची एकूण संख्या १,५३९ झाली आहे. यावर्षी या श्रीमंतांच्या एकूण संपत्तीत ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी आणि इतरांकडे किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया.(HT)