India New Goalkeeper : भारतीय हॉकी संघात पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? हे तीन गोलकीपर आहेत सर्वात मोठे दावेदार-who is replacement of goalkeeper pr sreejesh in indian hockey team krishan b pathak suraj karkera pawan malik in race ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  India New Goalkeeper : भारतीय हॉकी संघात पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? हे तीन गोलकीपर आहेत सर्वात मोठे दावेदार

India New Goalkeeper : भारतीय हॉकी संघात पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? हे तीन गोलकीपर आहेत सर्वात मोठे दावेदार

Aug 17, 2024 02:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • टीम इंडियाचा अनुभवी भारतीय हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आहे. ३६ वर्षीय श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय हॉकीसाठी ३३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
श्रीजेश याने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून संघाचा गौरव वाढवला आहे. आता त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या गोलपोस्टची जबाबदारी कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. श्रीजेशची जागा घेऊ शकतील अशा तीन संभाव्य गोलरक्षकांवर एक नजर टाकूया.
share
(1 / 5)

कृष्णा बी पाठक- कृष्णा पाठक हा भारतीय संघाचा सध्याचा सर्वात अनुभवी गोलरक्षक आहे. २०१८  मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृष्णाने आतापर्यंत १२५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दोन आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे. 
share
(2 / 5)

श्रीजेशसोबत एफआयएच प्रो लीगमध्ये खेळताना त्याने वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये गोलकीपिंगची जबाबदारी सांभाळली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभवासह, कृष्णाला सध्या भारतीय गोलकीपिंगच्या जबाबदारीसाठी सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहे. हे तिन्ही गोलरक्षक भारतीय हॉकी संघाचा नवा गोलरक्षक होण्याच्या शर्यतीत आहेत. मात्र, श्रीजेशसारखा अनुभवी आणि प्रतिभावान गोलरक्षक शोधणे सोपे जाणार नाही. 
share
(3 / 5)

सुरज करकेरा - सूरज करकेरा गेल्या ७ वर्षांपासून राष्ट्रीय संघाचा भाग आहे, मात्र त्याने आतापर्यंत केवळ ४३ सामने खेळले आहेत. २०१७ आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या सूरजने आपले गोलकीपिंग कौशल्य सिद्ध केले आहे. नुकत्याच ओमान येथे झालेल्या हॉकी ५ च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता राष्ट्रीय संघात पुनरागमन करून आपले स्थान पक्के करण्याचे सूरजचे ध्येय आहे.
share
(4 / 5)

पवन मलिक-  पवन मलिक हा भारतीय हॉकीच्या उदयोन्मुख गोलरक्षकांपैकी एक आहे. त्याने गेल्या वर्षी राउरकेला येथे एफआयएच प्रो लीगमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने प्रेक्षकांना प्रभावित केले. २०२१ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पवनने हळूहळू आपल्या खेळात सुधारणा केली आहे आणि आता तो राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज