मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Who is Rajat Patidar : रन मशीन रजत पाटीदार आहे तरी कोण? ज्यानं श्रेयस अय्यरची जागा घेतलीय

Who is Rajat Patidar : रन मशीन रजत पाटीदार आहे तरी कोण? ज्यानं श्रेयस अय्यरची जागा घेतलीय

Jan 17, 2023 10:03 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला सामना बुधवारी (१८ जानेवारी) हैदराबादमध्ये होणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यरच्या जागी रजत पाटीदार याचा समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला. श्रेयसच्या जागी आता रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

२९ वर्षीय रजत पाटीदारचा जन्म इंदूरमध्ये झाला असून तो मध्य प्रदेशकडून देशांतर्गत खेळतो. रजतने वयाच्या ८व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने आपल्या आजोबांच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

विशेष बाब म्हणजे पाटीदारने आपल्या करिअरची सुरुवात ऑफ ब्रेक स्पिनर म्हणून केली होती. पण अंडर-15 नंतर त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि आता तो एक विशेषज्ञ फलंदाज बनला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

रजत पाटीदारने नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्यानंतर एका महिन्यानंतर त्याने लिस्ट-ए करिअरलाही सुरुवात केली. २०१८-१९ चे रणजी सीझन त्याच्यासाठी संस्मरणीय होता, या मोसमात त्याने मध्य प्रदेशसाठी ८ सामन्यांत ५४.८४ च्या सरासरीने ७१३ धावा केल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

त्यानंतर २०२१ मध्ये, त्याला त्याचा पहिला आयपीएल करार मिळाला आणि तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग बनला. तथापि, रजत पाटीदार आयपीएल २०२२ मध्ये प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाबाद ११२ धावांची खेळी केली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

रजत पाटीदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये रन मशीन म्हणूनही ओळखला जातो. पाटीदारने ५० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४६.४३ च्या सरासरीने ३,६६८ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पाटीदारने ५१ सामन्यांमध्ये ३४.३३ च्या सरासरीने १,६३८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ शतके आणि ८ अर्धशतके झळकली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

T20 मध्ये पाटीदारने ४४ डावात १४६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. रजत पाटीदार आयपीएल २०२३ मध्येही आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

who is rajat patidar
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

who is rajat patidar(all photo- rajat patidar instagram)

WhatsApp channel

इतर गॅलरीज