Who is Meha Patel : अक्षर पटेलची होणारी बायको मेहा पटेल आहे तरी कोण? जाणून घ्या
who is meha patel : केएल राहुलनंतर आता आणखी एक भारतीय क्रिकेटर विवाहबंधनात (axar patel and meha patel wedding date) अडकणार आहे. ऑलराऊंडर अक्षर पटेल लवकरच लग्न करणार आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र, गुजराती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे की तो त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेलसोबत लग्न करणार आहे. अक्षरच्या होणाऱ्या पत्नीबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांना फारसे नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अक्षर पटेलची होणारी पत्नी मेहा पटेल कोण आहे?
(1 / 9)
अक्षरने कौटुंबिक कारणामुळे BCCI कडे सुट्टी मागितली होती. यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो भारतीय संघाचा भाग नाही.
(2 / 9)
भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याचा मेहा पटेलसोबत विवाह होणार आहे. अक्षर पटेलच्या होणाऱ्या पत्नीबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांना फारसे नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अक्षर पटेलची होणारी पत्नी मेहा पटेल कोण आहे?
(3 / 9)
मेहा पटेल ही एक प्रोफेशनल डायटीशियन आणि न्यूट्रीनिस्ट आहे. मेहा पटेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आहे. अक्षरच्या डाएट आणि फिटनेसची ती पूर्ण काळजी घेते.
(4 / 9)
सोबतच मेहा पटेलने इंस्टाग्राम अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय अनेकदा ती डाेएटशी संबंधित माहिती शेअर करत असते.
(5 / 9)
अक्षर पटेल मेहा पटेलसोबत जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार आहे. २६ जानेवारी रोजी वडोदरा येथील जेड गार्डनमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(6 / 9)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षरचा विवाहसोहळा ४ दिवसांचा असणार आहे. यामध्ये संगीत समारंभ, हळदी कार्यक्रम आणि विवाहसोहळा यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ किंवा २७ जानेवारीला अक्षरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.
(7 / 9)
अक्षर-मेहा यांची वर्षभरापूर्वी एंगेजमेंट झाली होती. काही काही वर्षांपूर्वी नडियाद येथे एका आईस बॉल स्पर्धेदरम्यान अक्षर-मेहा यांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. यानंतर अक्षरने मेहाला तिच्या वाढदिवसाला प्रपोज केले. यानंतर त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले.
(8 / 9)
अक्षर बऱ्याच दिवसांपासून मेहाला डेट करत आहे. गेल्या वर्षी आपल्या वाढदिवशी (२० जानेवारी) त्याने मेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. यानंतर त्याने काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली होती.
इतर गॅलरीज