नात्याला कधी झाली सुरुवात ?
बिल आणि पॉला यांच्या नात्याबद्दल चर्चा २०२३ मध्ये सुरू झाली. पॉला या ओरेकलचे माजी सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी असून मार्क यांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तर बिल गेट्स आणि मेलिंडा हे विभक्त होऊन २ वर्षे उलटून गेले आहे. यानंतर बिल आणि पॉला यांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघे एकमेकांच्या जवळ आले आहेत.
कोण आहेत पॉला हर्ड ?
ओरेकलचे माजी सीईओ मार्क हर्ड यांच्या विधवा पत्नी पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी १९८४ मध्ये व्यवसाय प्रशासनात बॅचलर पदवी देखील मिळवली. २०१९ मध्ये मार्कचा मृत्यू होईपर्यंत त्या तब्बल ३० वर्षे मार्कसोबत एकनिष्ठ राहिल्या.
कामाचा अनुभव
सॉफ्टवेअर कंपनीच्या अंतर्गत कामकाजात अनुभवी मानल्या जाणाऱ्या पॉलाने एनसीआरच्या सेल्स अँड अलायन्स मॅनेजमेंट क्षेत्रात म्हणजेच नॅशनल कॅश रजिस्टरमध्ये काम केले आहे. एनसीआर हे तंत्रज्ञान उद्योगातील एक मोठे नाव आहे.
मोठ्या देणगीदार
पॉला या पती मार्कच्या शाळेला, बेलर युनिव्हर्सिटीला मोठ्या प्रमाणात देणग्या देत असतात. विद्यापीठाने सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांच्या नावाचं एक स्वागत केंद्र देखील सुरू केलं. त्यांनी अलीकडेच बेलर बास्केटबॉल पॅव्हेलियनला ७ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. येथे मार्क आणि पॉला यांच्या नावावर एक इमारत बांधली जाणार आहे.