घरातील अनेक प्रौढांना ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवण्याची सवय असते. परंतु सर्व ड्राय फ्रूट्सला तसे करू नये. काही ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजवल्यास त्यातील पोषक द्रव्ये विरघळण्यास मदत होते. चला तर मग पाहूया कोणती ड्राय फ्रूट्स भिजवावी आणि कोणती भिजवू नयेत
ड्राय फ्रूट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फोलेट, लोह, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई असते आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
(shutterstock)बदाम भिजवून खावे. ते व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. यामुळे शरीरात पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बदाम भिजवून त्याचे साल काढून घेणे चांगले.
अक्रोड भिजवून बदामाप्रमाणे खावे. यात विविध प्रकारचे फॅटी अॅसिड, प्रथिने आणि खनिजे असतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. हे दूध किंवा पाण्यात भिजवून ठेवावे.
मनुका भिजवू नये. कारण ते भिजवल्यास पोषक द्रव्ये नष्ट होतात. म्हणून ते थेट खावे.
फ्लेक्स सीड्स ओमेगा ३ फॅट्स आणि फायबरमध्ये समृद्ध असतात. मेंदू आणि आतड्याच्या आरोग्यावर त्यांचा सकारात्मक परिणाम होतो. फ्लेक्स सीड्स भिजवण्याऐवजी भाजून वाळवून खावे.