जगन्नाथ रथयात्रेशी संबंधित अशी श्रद्धा आहे की या शुभ रथयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना १०० यज्ञांएवढी पुण्य मिळते.
((फोटो सौजन्य पीटीआय))पौराणिक कथेनुसार, एकदा राधा राणीने जगन्नाथ मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली. राधा मंदिरात आत जाण्यासाठी पाऊल टाकत असतानाच मंदिरातील पुजाऱ्याने राधेला दारातच थांबवले.
(ANI)राधा राणीने त्या पुजाऱ्यास असे करण्याचे कारण विचारले तर तेव्हा पुजारी म्हणाले की देवी तू श्रीकृष्णाची प्रेमीका आहेस आणि लग्नही झाले नाही आहे.
यावर राधा संतापली. राधा राणीने जगन्नाथ मंदिराला शाप दिला की, आतापासून जर कोणी अविवाहित जोडपे या मंदिरात एकत्र आले तर त्यांचे नाते टिकणार नाही, त्यांच्या नात्यातील प्रेम संपून जाईल.
त्या घटनेपासून असे मानले जाते की अविवाहित जोडप्यांनी एकत्र जगन्नाथ मंदिरात जाऊ नये. नात्यात कटुता निर्माण होऊन, प्रेम टिकत नाही अशी मान्यता आहे.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
((प्रतिमा एएनआय सौजन्याने))