मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  salman khan : सलमान खान यानं सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासऱ्यांकडून घेतलं होतं कर्ज! अजूनही फेडलं नाही!

salman khan : सलमान खान यानं सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासऱ्यांकडून घेतलं होतं कर्ज! अजूनही फेडलं नाही!

Jun 20, 2024 03:23 PM IST
  • twitter
  • twitter
Salman Khan And Iqbal Ratansi: सलमानने झहीरचे वडील आपली ‘वैयक्तिक बँक’ असल्याचे जाहीरपणे स्वीकारले आहे. आजपर्यंत तो इक्बाल रतनसी यांचे ऋणी असल्याचेही त्याने म्हटले आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि तिचा होणारा पती झहीर इक्बाल यांचे सलमान खानशी घट्ट नाते आहे. सोनाक्षीने तिच्या लग्नाचे पहिले निमंत्रण सलमान खानला पाठवल्याचे कळत आहे. दरम्यान, सलमान खान आणि झहीरचे वडील इक्बाल रतनसी यांची एक जुनी गोष्ट व्हायरल होत आहे. सलमानने झहीरचे वडील आपली ‘वैयक्तिक बँक’ असल्याचे जाहीरपणे स्वीकारले आहे. आजपर्यंत तो इक्बाल रतनसी यांचे ऋणी असल्याचेही त्याने म्हटले आहे.
share
(1 / 5)

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर, लोकांना तिचा भावी पती झहीर इक्बालबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. २०१८मध्ये सलमान खानने एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘इक्बाल रतनसी माझ्या तरुणपणी माझी पर्सनल बँके होते. आजही मी त्यांचे २०११ रुपये देणे बाकी आहे. सुदैवाने आजपर्यंत त्यांनी या कर्जावर व्याज मागितले नाही.’
share
(2 / 5)

सलमान खान आणि झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी हे एकमेकांचे जुने मित्र आहेत. सलमान खान हा त्याच्या सुरुवातीच्या काळात इक्बाल रतनसी यांच्याकडून अनेकदा पैसे उसनवारी घ्यायचा. दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. सलमान खाननेच सोनाक्षी आणि झहीर यांची पहिली भेट घडवून आणली होती.
share
(3 / 5)

झहीर इक्बालने मोहनीश बहलची मुलगी के प्रनूतनसोबत ‘नोटबुक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी झहीर हा सलमानच्या मित्राचा मुलगा असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. सलमान खानच्या पाठिंब्याने त्याला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हालाही सलमान खानने बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. तिचा पहिला ‘दबंग’ चित्रपट सलमानसोबत होता. सोनाक्षी आणि झहीरने २०२२मध्ये ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.
share
(4 / 5)

सोनाक्षी आणि झहीर इक्बाल २३ जूनला लग्न करणार आहेत. या दोघांनी कोर्ट मॅरेज केले असावे, असे त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे म्हणणे आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव यांनी या लग्नाचा प्रश्न टाळला होता, ज्यावरून विविध प्रकारचे कयास बांधले जात होते. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी सगळ्यांनाच चोख उत्तर दिले.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज