Pet Movies: प्राण्यांनीही अनेकदा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही चित्रपटांमध्ये श्वानांची भूमिका अभिनेत्यांइतकीच महत्त्वाची आहे. चला जाणून घेऊया या सिनेमांविषयी
(1 / 6)
अनेकांचे प्राण्यांवर प्रचंड प्रेम असते. प्राणी देखील मानवाप्रती अत्यंत निष्ठावान असल्याचे मानले जाते. आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड चित्रपटांबद्दल सांगत आहोत ज्यात प्राण्यांची भूमिका महत्त्वाची होती.(instagram)
(2 / 6)
जूनियर: द वंडर डॉग हा सिनेमा २०१४मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, तमन्ना भाटिया महत्त्वाच्या भूमिकेत होते. या ॲक्शन आणि कॉमेडी सिनेमात श्वान हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असल्याचे दाखवण्यात आले आहे.(instagram)
(3 / 6)
तेरी मेहरबानियाँ या ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटात एक कुत्रा देखील आहे, ज्याचे नाव मोती आहे. हे देखील मुख्य पात्र आहे. तो त्याच्या मालकांच्या खुनाचा बदला घेतो.
(4 / 6)
हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन नितीश तिवारी आणि विकास बहल यांनी केले होते. हा चित्रपट एका अनाथ मुलाभोवती फिरतो ज्याच्याकडे कुत्रा असतो.
(5 / 6)
१९९४ च्या सुपरहिट चित्रपट हम आपके है कौन मध्ये कुत्रा टफीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील टफी प्रेक्षकांनाही खूप आवडली. या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्याच्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
(6 / 6)
मैं ने प्यार किया हा चित्रपट कोण विसरू शकेल? यामध्ये हँडसम म्हणवल्या जाणाऱ्या कबुतरने प्रेम (सलमान) आणि सुमन (भाग्यश्री) यांच्या प्रेमकथेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
(7 / 6)
दिल धडकने दो या चित्रपटात त्यात प्लूटो या कौटुंबिक कुत्र्याची भूमिका होती. प्लूटोचा व्हॉईसओव्हर आमिर खानने दिला होता.