मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  What Remedies To Do On Masik Shivratri

Masik Shivratri : मासिक शिवरात्रीला करा हा उपाय, मिळेल कर्जातून मुक्ती, दूर होतील अनेक समस्या

May 17, 2023 01:05 PM IST Dilip Ramchandra Vaze
May 17, 2023 01:05 PM , IST

Masik Shivratri: दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करून घेता येतं.

हिंदू धर्मात भगवान शिवाला महादेव म्हणून ओळखलं जातं. दर महिन्यात एक शिवरात्र येते. आज म्हणजेच १७ मे २०२३ रोजी मासिक शिवरात्र साजरी केली जात आहे. देवाधिदेवांचा हा दिवस अत्यंत श्रद्धेनं पार पाडला जातो. या दिवशी भगवान शंकराला बेलाची पाने, फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण केल्यानंतर शिव मंत्रांचा जप करणे फलदायी मानले जाते. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय आहेत, ज्याद्वारे लोक सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात.

(1 / 6)

दही आणि मध यांचं एक मिश्रण तयार करा आणि भगवान शिवाला त्याचा नैवेद्य दाखवा. आता भक्तीभावाने शंकराला नमस्कार करा. असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतील आणि कुटुंबातली सुख समृद्धी टिकून राहील.

(2 / 6)

लाख प्रयत्न करूनही समस्या तशीच राहीली असेल तर मूठभर तांदूळ घेऊन जवळच्या शिवमंदिरात अर्पण करा. थोडा तांदूळ गरजूंना दान करा. असं केल्याने तुमची समस्या भगवान शिवांच्या आशिर्वादाने चुटकीसरशी सुटेल.

(3 / 6)

जर एखादा शत्रू तुम्हाला खूप दिवसांपासून त्रास देत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान करून मंदिरात शिवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शिवमंत्रांचा जप करा. असे केल्याने शत्रूपासून लवकरच सुटका होईल.

(4 / 6)

आपल्या कुटुंबात संपत्ती आणि भौतिक सुख वाढवायचे असल्यास मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि घराजवळील शिव मंदिरातील शिवलिंगाला गंगाजल अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला लवकरच सापत्तीक आणि भौतिक सुखात वाढ दिसून येईल.

(5 / 6)

जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला सव्वा किलो तांदूळ शिवमंदिरात दान करा. त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

(6 / 6)

जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि तुम्हाला त्या कर्जातून मुक्ती हवी असेल तर दर मासिक शिवरात्रीला सव्वा किलो तांदूळ शिवमंदिरात दान करा. त्याचबरोबर भगवान शिवाला साखरही अर्पण करा. हा उपाय केल्याने तुमची कर्जमुक्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.(Unsplash)

WhatsApp channel

इतर गॅलरीज