Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथाला चिंता मूषकांची, देवाचा पोशाख उंदरांनी कुरतडला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथाला चिंता मूषकांची, देवाचा पोशाख उंदरांनी कुरतडला

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथाला चिंता मूषकांची, देवाचा पोशाख उंदरांनी कुरतडला

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथाला चिंता मूषकांची, देवाचा पोशाख उंदरांनी कुरतडला

Mar 22, 2023 08:16 AM IST
  • twitter
  • twitter
उंदरांचा त्रास कमी करण्यासाठी एका भक्ताने अत्याधुनिक यंत्र मंदिराला दान केलं. मात्र त्या यंत्राने जगन्नाथाची निद्रा भंग होऊ शकेल असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात उंदरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे.जगन्नाथाच्या सेवकांना याची फार काळजी वाटत होती. अशातच जगन्नाथाच्या एका भाविकाने याच उंदरांना रोखण्यासाठी एका अत्याधुनिक सापळ्याचं दान मंदिराला केलं.. मात्र त्याने चिंता कमी होण्याऐवजी एक वेगळीच चिंता मंदिर प्रशासनाला पडली आहे. हे यंत्र बसवलं गेलं तर त्याच्या आवाजाने जगन्नाथाच्या निद्रेत बाधा येईल असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.(ANI Photo)
twitterfacebook
share
(1 / 4)
पुरीच्या जगन्नाथ मंदिरात उंदरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे.जगन्नाथाच्या सेवकांना याची फार काळजी वाटत होती. अशातच जगन्नाथाच्या एका भाविकाने याच उंदरांना रोखण्यासाठी एका अत्याधुनिक सापळ्याचं दान मंदिराला केलं.. मात्र त्याने चिंता कमी होण्याऐवजी एक वेगळीच चिंता मंदिर प्रशासनाला पडली आहे. हे यंत्र बसवलं गेलं तर त्याच्या आवाजाने जगन्नाथाच्या निद्रेत बाधा येईल असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे.(ANI Photo)(ANI)
दरम्यान, हे यंत्र बसविण्यास मंदिर परिचारक विरोध करत असताना उंदरांनी आता थेट देवाच्या पोशाखाला आपलं लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक पोशाखांवर उंदरांच्या कुरतडण्याच्या खुणा आहेत .यावरचा उपाय म्हणून ते मशीन त्या भक्तांने मंदिराला दान केलं, मात्र त्यालाही वापरण्यास मंदिराचा विरोध आहे. एकंदरीत जगाचा कारभार वाहाणाऱ्या जगन्नाथाच्या मंदिरातले सेवेकरी मात्र चांगलेच चिंतेत पडल्याचं पाहायला मिळतंय.(PTI Photo) 
twitterfacebook
share
(2 / 4)
दरम्यान, हे यंत्र बसविण्यास मंदिर परिचारक विरोध करत असताना उंदरांनी आता थेट देवाच्या पोशाखाला आपलं लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक पोशाखांवर उंदरांच्या कुरतडण्याच्या खुणा आहेत .यावरचा उपाय म्हणून ते मशीन त्या भक्तांने मंदिराला दान केलं, मात्र त्यालाही वापरण्यास मंदिराचा विरोध आहे. एकंदरीत जगाचा कारभार वाहाणाऱ्या जगन्नाथाच्या मंदिरातले सेवेकरी मात्र चांगलेच चिंतेत पडल्याचं पाहायला मिळतंय.(PTI Photo) (PTI)
एका सेवकाच्या म्हणण्यानुसार, ''मंदिरातील मूर्ती सध्या शाबूत असल्या तरी मूर्तींचे कपडे मोठ्या प्रमाणात उंदरांनी कुरतडले आहेत.'' एवढेच नाही तर सोमवारी मंदिरात उंदीर देवाचे कपडे कुरतडताना पाहायला मिळाले. देवाला अर्पण केलेल्या फुलांवर आणि इतर गोष्टींनाही उंदरांनी लक्ष्य केलं असल्याचं या सेवकाचं म्हणणं आहे. (PTI Photo) 
twitterfacebook
share
(3 / 4)
एका सेवकाच्या म्हणण्यानुसार, ''मंदिरातील मूर्ती सध्या शाबूत असल्या तरी मूर्तींचे कपडे मोठ्या प्रमाणात उंदरांनी कुरतडले आहेत.'' एवढेच नाही तर सोमवारी मंदिरात उंदीर देवाचे कपडे कुरतडताना पाहायला मिळाले. देवाला अर्पण केलेल्या फुलांवर आणि इतर गोष्टींनाही उंदरांनी लक्ष्य केलं असल्याचं या सेवकाचं म्हणणं आहे. (PTI Photo) (PTI)
आता या उंदरांचं करायचं काय अशा संभ्रमात, चिंतेत मंदिर व्यवस्थापन आहे. आता या उंदरांना रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्याच्या निर्णयावर मंदिर प्रशासन आलं असल्याची माहिती आहे. उंदाराने कुरतडलेले पोशाख पुन्हा देवाला घातला जाणार नाही असंही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)
आता या उंदरांचं करायचं काय अशा संभ्रमात, चिंतेत मंदिर व्यवस्थापन आहे. आता या उंदरांना रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्याच्या निर्णयावर मंदिर प्रशासन आलं असल्याची माहिती आहे. उंदाराने कुरतडलेले पोशाख पुन्हा देवाला घातला जाणार नाही असंही मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इतर गॅलरीज