विनेश फोगटला कोणत्या नियमानुसार अपात्र ठरवण्यात आले? UWW नियम काय सांगतो? जाणून घ्या-what is the uww rule from which vinesh phogat got disqualified paris olympics ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  विनेश फोगटला कोणत्या नियमानुसार अपात्र ठरवण्यात आले? UWW नियम काय सांगतो? जाणून घ्या

विनेश फोगटला कोणत्या नियमानुसार अपात्र ठरवण्यात आले? UWW नियम काय सांगतो? जाणून घ्या

विनेश फोगटला कोणत्या नियमानुसार अपात्र ठरवण्यात आले? UWW नियम काय सांगतो? जाणून घ्या

Aug 07, 2024 04:06 PM IST
  • twitter
  • twitter
  • Vinesh Phogat: भारताची विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलसाठी अपात्र ठरली आहे. विनेशेने ५० किलो वजनी एकाच दिवशी (६ ऑगस्ट) तीन सामने जिंकून फायनल गाठली होती. भारतीय चाहते ६ ऑगस्टच्या रात्री विनेश फोगटच्या सुवर्णपदकाचे स्वप्न घेऊन झोपी गेले होते, पण ७ ऑगस्टच्या सकाळी हे स्वप्न अचानक भंगले.
फायनल सामन्याआधी वजन तपासले असता, विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक निघाले, त्यामुळे ती अपात्र ठरली आणि आता तिला कोणतेही पदक मिळणार नाही. 
share
(1 / 5)
फायनल सामन्याआधी वजन तपासले असता, विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक निघाले, त्यामुळे ती अपात्र ठरली आणि आता तिला कोणतेही पदक मिळणार नाही. (HT_PRINT)
खरे तर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या नियमांनुसार दोन दिवसांत सामने होतात आणि दोन्ही दिवशी सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंचे वजन केले जाते. विनेशचे वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तिचे वजन १००-१५० ग्रॅम अधिक आले आणि तिला अपात्र ठरविण्यात आले.
share
(2 / 5)
खरे तर ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या नियमांनुसार दोन दिवसांत सामने होतात आणि दोन्ही दिवशी सहभागी होणाऱ्या कुस्तीपटूंचे वजन केले जाते. विनेशचे वजन कमी करण्यासाठी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तिचे वजन १००-१५० ग्रॅम अधिक आले आणि तिला अपात्र ठरविण्यात आले.(PTI)
कुस्तीमध्ये वजनाचा नियम काय?- वजनाबाबतच्या नियमांनुसार कुस्तीपटूला ज्या दिवशी खेळायचे आहे, त्या दिवशी त्याचे वजन घेतले जाते. प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवसांत होतात, त्यामुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या कुस्तीपटूंना दोन्ही दिवशी वजन करावे लागते.
share
(3 / 5)
कुस्तीमध्ये वजनाचा नियम काय?- वजनाबाबतच्या नियमांनुसार कुस्तीपटूला ज्या दिवशी खेळायचे आहे, त्या दिवशी त्याचे वजन घेतले जाते. प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवसांत होतात, त्यामुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या कुस्तीपटूंना दोन्ही दिवशी वजन करावे लागते.(PTI)
कुस्तीपटूला वजन करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी दिला जातो. या काळात त्यांना हव्या तितक्या वेळा वजन करता येते. यावेळी कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार तर नाही ना, किंवा त्यांची नखं कापली आहेत की नाही याची तपासणी केली जाते.
share
(4 / 5)
कुस्तीपटूला वजन करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी दिला जातो. या काळात त्यांना हव्या तितक्या वेळा वजन करता येते. यावेळी कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार तर नाही ना, किंवा त्यांची नखं कापली आहेत की नाही याची तपासणी केली जाते.(PTI)
ज्या कुस्तीपटूंना सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घ्यावा लागतो, त्यांना वजन करण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळतो. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियमांनुसार कुस्तीपटूचे वजन निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते.
share
(5 / 5)
ज्या कुस्तीपटूंना सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घ्यावा लागतो, त्यांना वजन करण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळतो. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियमांनुसार कुस्तीपटूचे वजन निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते.(PTI)
इतर गॅलरीज