आजकाल जवळपास सर्वांच्या घरात टीव्ही असतो. फक्त टीव्हीची वेगवेगळी साईज आपल्याला पाहायला मिळते. घरात बसून टीव्हीवर मालिका पाहाणे, सिनेमे पाहणे, मॅच पाहाणे नेहमीच आनंददायी असते. पण तुम्हाला माहिती आहे का टीव्ही एका विशिष्ट अंतरावर बसून पाहण्याचा सल्ला तज्ञ देताता. चला जाणून घेऊया त्याविषयी…
असे म्हटले जात आहे, जेव्हा तुम्ही टीव्हीवर सर्व मजकूर किंवा सामग्री प्ले होत असल्याचे स्पष्टपणे पाहू शकता, तेव्हा ते तुमच्या टीव्ही पाहण्यासाठी योग्य अंतर आहे. टीव्ही पाहण्यासाठी तुम्ही सोफा, बेड किंवा खुर्चीपासून किती दूर बसता हे ठरवणारे काही घटक आहेत. तुम्ही किती फूट दूर बसून टीव्ही पाहावा यावर टीव्हीचा आकार अवलंबून असतो.
किती दूर बसून टीव्ही पाहणे चांगले - 'द टाइम्स ऑफ इंडिया'मधील एका लेखात म्हटले आहे की, जर टीव्हीचा स्क्रीन आकार २४ इंच असेल तर ३ ते ६ फूट अंतर चांगले आहे. जर स्क्रीनचा आकार ३२ इंच असेल तर ४ ते ८ फूट अंतर उत्तम असते. स्क्रीनचा आकार ४० ते ४३ इंच असल्यास, ५ ते १० फूट अंतरावरून टीव्ही पाहिला पाहिजे. तसेच, स्क्रीनचा आकार ५० इंच असेल तर तो ६ ते १२ फूट अंतरावरून टीव्ही पाहणे योग्य आहे.
रिझोल्यूशन- एकदा तुम्ही खोलीच्या जागेनुसार स्क्रीनचा आकार ठरवला की रिझोल्यूशन आणि डिस्प्ले तंत्रज्ञानाचा विचार केला पाहिजे. त्यामुळे टीव्ही पाहताना सुखद अनुभूती येण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
रिझोल्यूशननुसार अंतर- जर टीव्हीचे रिझोल्यूशन एचडी रेडी असेल आणि स्क्रीनचा आकार २४ इंच असेल तर ३ ते ६ फूट अंतरावर बसणे चांगले. रिझोल्यूशन HD रेडी असेल तर ३२ इंचाचा टीव्ही ४ ते ८ फूट अंतरावर ठेवणे उत्तम राहिल. तुमच्याकडे फुल एचडीमध्ये ४० ते ४३ इंच टीव्ही असल्यास ५ ते १० फूट दूर बसणे चांगले. फुल एचडी मध्ये ४९ इंचाचा टीव्ही असेल तर ६ ते १२ फूट अंतरावरून पाहणे उत्तम राहिल.