भारतातील पाहिली लक्झरी सुपरफास्ट ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीला पडली आहे. सध्या देशात चेअर कार वंदे भारत धावत असून लवकरच वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर गाड्या देखील देशभरात धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना आता झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही २०१९मध्ये धावली. ही गाडी वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर धावली. देशातील ही सर्वाधिक वेगवान गाडी असून देशात १३६ वंदे भारत एक्सप्रेस या रुळांवर धावत आहेत. वंदे भारतचा कमाल वेग हा १६० किमी प्रति तास एवढा आहे.
गेल्या काही दिवसांत वंदे भारत एक्सप्रेसच्या अनेक फेऱ्या या संपूर्ण देशात सुरू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात देखील गेल्या काही महिन्यात नव्या फेऱ्या या सुरू करण्यात आल्या आहेत. या गाडीत प्रवाशांना उच्च दर्जाच्या सेवा दिल्या जातात. तुम्हाला माहिती आहे का ? एक वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी व ती तयार करण्यासाठी कीती पैसे लागतात. आज आपण या बद्दल माहिती जाऊन घेणार आहोत.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या कोचची निर्मिती ही चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाला एकूण १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. तसेच ही रेल्वे चालवण्यासाठी देखील सरकारला रोज मोठा खर्च करावा लागतो.
वंदे भारत एक्सप्रेस ही भारताची हाय स्पीड प्रीमियम ट्रेन असून ती प्रामुख्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावते. वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा खर्च हा १ किलोमीटरमागे २००० ते २५०० हजार आहे. वंदे भारत ट्रेनच्या ५०० किलोमीटरचा प्रवासाठी फक्त विजेचा खर्च हा १० ते १२ लाख रुपये येतो. तसेच ही ट्रेन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर व या गाडीच्या संपूर्ण व्यवस्थापनावर दरवर्षी सुमारे २ ते ३ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाचा खर्च होतो.
वंदे भारत ट्रेनच्या देखभालीसाठी दरवर्षी १० ते १२ कोटी रुपये खर्च रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येतो. हा खर्च प्रामुख्याने गाडीची साफसफाई, दुरुस्ती व तांत्रिक सुधारणा या साठी केला जातो. वंदे भारत ट्रेन तयार झल्यावर ती चालवण्यासाठी व तिच्या देखभालीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. ही प्रीमियम सेवा देणारी ट्रेन असल्याने तिचे तिकिट दर देखील हे जास्त आहे.
वंदे भारत एक्सप्रेसचा खर्च जास्त असला तरी या गाडीला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. या गाडीतून मोठे उत्पन्न प्रशासनाला मिळत आहे. या गाडीच्या बुकिंगला देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असून येत्या काही दिवसांत या गाडीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे.
(Hindustan Times)