रिलेशनशिपमध्ये ते यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींना समान प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक आहे. अंडरस्टँडिंग, संवाद, निष्ठा, विश्वास आणि तडजोड हे निरोगी नात्याचे काही बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. थेरपिस्ट सदफ सिद्दीकी यांनी पुढे काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यासाठी आपण नाते निरोगी, आनंदी आणि सुरक्षित बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सुरक्षित प्रेम निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या बोलण्याशी आणि कृतीशी सुसंगत असणे. विश्वास हा भावनिक विश्वासार्हतेचा पाया आहे आणि आपण हळूहळू आणि स्थिरपणे विश्वास निर्माण केला पाहिजे.
(Unsplash)आपण चांगले श्रोते बनायला शिकले पाहिजे. आपण जोडीदाराला व्यत्यय न आणता बोलू देणे आणि त्यांच्या भावना शेअर करणे आवश्यक आहे. त्यांना कसे वाटते हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या भावना गुंतवल्या पाहिजेत.
आपण आपल्या जोडीदाराबद्दल नेहमीच सहानुभूती बाळगली पाहिजे, अगदी अशा वेळी जेव्हा आपण त्यांच्याशी सहमत नसतो. मतभेद स्वीकारणे आणि तरीही आपुलकी बाळगणे हा सुरक्षित नात्याचा एक आवश्यक भाग आहे.
नात्यात आपण मोकळे आणि प्रामाणिक असायला हवे. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराबरोबर पारदर्शक राहण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे.