वजन कमी करण्यासाठी अनेक जण खाणे कमी करतात. न खाता वजन कमी करण्याचे परिणाम प्राणघातक ठरू शकतात. या पद्धतीने शरीरातील चरबी अजिबात कमी होत नाही. याबद्दल जाणून घेऊया…
आहार कमी केल्यास मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचतो. हे संकेत शरीरात पुरेसे अन्न नसल्याचे सूचित करतात. मग शरीर सर्वप्रथम शरीरातील सर्व स्नायूंना लक्ष्य करते.
त्यामुळे बरेच दिवस कमी अन्न खाल्ल्यास मेंदूचे शेवटी चरबीवर लक्ष केंद्रित होते. त्यानंतर चरबीमधून साठवलेली ऊर्जा नष्ट होऊ लागते. मात्र, तोपर्यंत स्नायू खूप कमकुवत झालेले असतात.
(Shutterstock)म्हणून, वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या अन्नाचे सेवन कमी करू नये. खाणे कमी केले तर वजनात कोणताही बदल होणार नाही. वजन कमी करण्यासाठी खरं तर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी करावे लागतात. तसेच, आपण चरबी जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करू शकता.
त्याऐवजी आहारात जास्त फायबरयुक्त पदार्थ ठेवा. प्रथिने खा. केळी, सफरचंद, पेरू, नाशपाती, लिंबू अशी फळे तुम्ही खाऊ शकता. तसेच, आहारात सोयाबीन, अंडी, मासे, मांस घेऊ शकता.
(Unsplash)