नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्रिग्रही योग तयार होणार आहे. खरं तर या आठवड्यात चंद्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत एकत्र प्रवास करतील. या सप्ताहात ग्रहांच्या अशा शुभ संयोगाचा फायदा अनेक राशींना होईल. त्रिग्रही योगामुळे सिंह, कन्या, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअर आणि आर्थिक लाभाच्या बाबतीत मोठे यश मिळेल. या सप्ताहात या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासह काही मोठी खुशखबर मिळू शकते. टॅरो कार्डवरून जाणून घेऊया साप्ताहिक टॅरो राशीभविष्य.
मेष :
टॅरो कार्डच्या गणनेवरून असे दिसून येते की, मेष राशीचे लोक या आठवड्यात खूप आक्रमक असणार आहेत. म्हणजेच या आठवड्यात तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण ऊर्जेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कोणत्याही जवळच्या नात्यातून मोठा फायदा होणार आहे. या सप्ताहात कुटुंबाशी तुमचे नाते खूप घट्ट होणार आहे.
वृषभ :
वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात खूप मेहनत घ्यावी लागेल, असे टॅरो कार्डच्या गणनेवरून दिसून येते. करिअरमध्ये मोठं यश मिळवायचं असेल तर मेहनत करावी लागेल. या आठवड्यात आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल खूप तणावातून जात आहात. आपल्या जवळच्या भावंडांशी ही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या अखेरीस अचानक नफा मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन :
टॅरो कार्डच्या गणनेनुसार मिथुन राशीचे लोक या आठवड्यात फिरायला जाऊ शकतात. या आठवड्यात कुठेही जाण्यापूर्वी सुरक्षेची योग्य व्यवस्था करा. या सप्ताहात आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
कर्क :
कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे, असे टॅरो कार्डवरून दिसून येते. कारण, या आठवड्यात ग्रहांची स्थिती आपल्या बाजूने नाही. या काळात नवीन प्रकल्प सुरू करणे हानीकारक ठरू शकते. नोकरी व्यवसायात नफ्यापेक्षा तोटा होण्याची शक्यता जास्त असू शकते.
सिंह :
टॅरो कार्डच्या गणनेनुसार सिंह राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात जमीन आणि इमारतीशी संबंधित कामात लाभ मिळेल. मुलांसाठी काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
कन्या :
टॅरो कार्डची गणना सांगते की, कन्या राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि प्रगती घेऊन येईल. या सप्ताहात भौतिक लाभांमध्ये वाढ दिसून येईल. तथापि, या आठवड्यात कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा अभाव राहील. विरोधकांवर आणि शत्रूंवर तुमचा प्रभाव राहील.
तूळ :
टॅरो कार्डची गणना असे सूचित करते की, तूळ राशीच्या लोकांसाठी आठवडा अजिबात अनुकूल नाही. कारण, या आठवड्यात तुमचे विरोधक मनातील मत्सरामुळे तुमच्याविरोधात षडयंत्र रचू शकतात. न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. कौटुंबिक सुखाची कमतरता राहू शकते आणि पालकांसाठी समस्या उद्भवू शकतात.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांना आज अनेक कामांमध्ये रस असणार आहे. या आठवड्यात वरिष्ठ अधिकारांच्या मदतीने तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात अनावश्यक अडथळ्यांमुळे मन अशांत होऊ शकते.
धनु :
टॅरो कार्डच्या गणनेनुसार धनु राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आपल्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे चांगले फळ मिळू शकते. तसेच या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत विस्तारतील. या आठवड्यात समस्येपासून सुटका होणार आहे. मात्र, या आठवड्यात विजेशी संबंधित कामात थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
मकर :
टॅरो कार्डच्या गणनेनुसार मकर राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन काहीसा सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य आणि संपत्तीचा लाभ मिळू शकतो. कामे पूर्ण होण्यास उशीर होईल. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करून या आठवड्यात बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ :
कुंभ राशीच्या व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांमुळे कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा करणे टाळावे, असे टॅरो कार्डचे गणित सांगते. यामुळे कटुतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीलाही सामोरे जावे लागेल. मात्र, या आठवड्याच्या अखेरीस तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल.