राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत अमरावती आणि चंद्रपूरमध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. तर नागपूर आणि अमरावती या शहरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे मुंबई नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
आजही राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासांत कोकण, विदर्भातील रायगड, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
(Deepak Salvi)उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि अहमदनगर या ३ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(Hindustan Times)पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.