मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान! सात हजार पोलिस तैनात, ईव्हीएमचे वितरण

Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान! सात हजार पोलिस तैनात, ईव्हीएमचे वितरण

May 12, 2024 01:19 PM IST Ninad Vijayrao Deshmukh

  • Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी ही मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी ही मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या  मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरासाठी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

सर्व वाणिज्यिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल ५ हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तुकड्या, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, नऊ पोलीस उपायुक्त, १७ सहायक आयुक्त, ६४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच पाच हजार ५८४ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दोन हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या, केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तीन तुकड्या नेमण्यात आल्या आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

पुणे लोकसभा मतदार संघात दोन हजार १८ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी १८५ मतदान केंद्रात पाचपेक्षा जास्त मतदान कक्ष आहेत. वडगाव शेरी, कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रातील इमारतीत पाचपेक्षा जास्त मतदान कक्ष आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

शिरुर लोकसभा मतदार संघातील काही भागाचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात होतो. पुणे पोलिसांकडून पुणे लोकसभा, तसेच शिरुर लोकसभा मतदार संघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे  रोजी बंद राहतील. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज