फिलीपीन्समध्ये बेटावर ज्वालामुखीचा स्फोट झाला असून यामुळे सभोवतालच्या वातावरणात हजारो टन तप्त राखेचे लोट पसरले आहेत. ज्वालामुखीमुळे मध्य फिलीपीन्सच्या प्रांतात गावात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
(AFP)फिलीपीन्समध्ये ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यामुळे त्यातून हजारो टन लाव्हा निघत असून सर्वत्र राख पसरली आहे. परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला या राखेमुळे धोका पोहचू नये म्हणून त्यांना तात्पुरत्या कापडी तंबूत हलवण्यात आले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे जवळपास १ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या ज्वालामुखीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
(AFP)फिलीपीन्सच्या निग्रोस बेटावरील (Central Negros Island) कनलाओन नावाच्या पर्वताच्या टोकावर या ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. ज्वालामुखीच्या या स्फोटामुळे राखेचे प्रचंड लोट तब्बल २०० किमी हवेत उडत असल्यामुळे फिलीपींसहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. ही राख समुद्रात जाऊन पाण्यात मिसळल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
(AP)फिलीपीन्समध्ये आगामी काळात ज्वालामुखीचा आणखी मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कानलाओन बेटावरील ज्वालामुखीचा भविष्यात स्फोट होऊ शकतो, असा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्केनॉलॉजी अँड सिस्मोलॉजीकडून धोक्याचा इशारा तीनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
(AFP)फिलीपीन्समध्ये एकूण २४ जीवंत ज्वालामुखी आहेत. मध्य फिलीपीन्समधील नेग्रोस हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ३००० मीटर उंचीवर आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात येथे ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. त्यावेळी ज्वालामुखीच्या स्फोटानंतर विषारी वायूची गळती झाली होती. १९९६ साली या बेटावर लाव्हा पडल्याने दोन हाइकर्सचा मृत्यू झाला होता.
(AFP)