
आता बॉलिवूड चित्रपटांपेक्षा साऊथचे चित्रपट जास्त लोकप्रिय होत आहेत. कमाईच्या बाबतीत साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडत आहेत. नुकताच साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट दक्षिणेपेक्षा हिंदी पट्ट्यात जास्त पसंत केला जात आहे. पण 'पुष्पा 2' च्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज देणारा अभिनेता कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी साऊथ स्टार्सच्या चित्रपटांसाठी डबिंग केले आहे.
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' च्या हिंदी व्हर्जनला आवाज दिला आहे.
टीव्ही आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. शरद हा एक उत्कृष्ट डबिंग कलाकार देखील आहे. हिंदीत रिलीज झालेल्या बाहुबलीमधील प्रभासच्या पात्राला शरदने आपला आवाज दिला आहे. त्याने केवळ दक्षिणेतच नाही तर अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी डबमध्येही आपला आवाज दिला आहे.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणनेही साऊथ चित्रपटांसाठी डबिंग केले आहे. साऊथचा सुपरस्टार राम चरणच्या 'ध्रुव' या चित्रपटाला त्याने आपला आवाज दिला आहे.
बाहुबली चित्रपटातील राणा दग्गुबतीची भूमिका सर्वांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत राणा या व्यक्तिरेखेसाठी मनोज पांडेने आपला आवाज दिला आहे.
अभिनेता चैतन्य अदीब एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. प्रभासच्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपला आवाज दिला आहे.




