
ख्रिसमसचा खरा आनंद परदेशातच मिळू शकतो असं अजिबात नाही. भारतातही अनेक ठिकाणी ख्रिसमसचा आनंद लुटता येतो. या ख्रिसमसच्या सुट्टीतील पुढील पाच ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी भेट द्या.
(Representative Image (Unsplash))Shillong: मेघालयातील या शहरात ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. येथे भेट दिल्यास तुम्हाला ख्रिसमसचा सण जवळून बघता येईल. सणाच्या काळात रस्ते दिव्यांनी उजळून निघतात.
(Representative Image (Unsplash))Goa: या डिसेंबरला भेट देण्यासाठी गोवा हे शहर योग्य आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे आणि नाइटलाइफ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आदर्श आहेत. यावेळी पर्यटकांची वर्दळही जास्त असते.
(Representative Image (Unsplash))Kerala: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही केरळच्या ट्रिपची योजना आखू शकता. दक्षिण भारतातील ख्रिसमसच्या वेळी भेट देण्यासारखे हे सर्वात सुंदर ठिकाण आहे.
(Representative Image (Unsplash))Pondicherry: सुंदर समुद्रकिनारे आणि कॅथोलिक चर्चसह, पाँडिचेरी हे ख्रिसमसच्या हंगामात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. पर्यटक येथे अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.
(Representative Image (Unsplash))


