Virat Kohli Gifts His Bat to Rinku Singh: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने युवा फलंदाज रिंकू सिंहला त्याची बॅट गिफ्ट केली आहे.
(1 / 8)
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर २९ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला कोलकाता नाईट रायडर्सकडून ७ गडी राखून पराभव पत्करावा लागला.(AFP)
(2 / 8)
या सामन्यात केकेआरने आरसीबीला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली, तर बेंगळुरूला स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबीला फक्त एकच विजय मिळवता आला आहे.(AFP)
(3 / 8)
आरसीबीच्या पराभवाने निराश होऊनही विराट कोहलीच्या एका निर्णयाचे चाहत्यांनी कौतुक केले. सामन्यानंतर कोहलीने युवा खेळाडूंना सल्ला आणि प्रोत्साहन दिले आहे.(AFP)
(4 / 8)
आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहला विराट कोहलीने खास भेट दिली.
(5 / 8)
आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या रिंकू सिंगला कोहलीने आपली खास बॅट गिफ्ट केली. रिंकूने इन्स्टाग्रामवर बॅट दिल्याबद्दल त्याचे आभार मानले.
(6 / 8)
सामन्यानंतर आरसीबीने शेअर केलेल्या ड्रेसिंग रूम व्हिडिओमध्ये रिंकू कोहलीला भेटली ज्यात तो स्वाक्षरी केलेली बॅट देताना दिसत आहे.
(7 / 8)
या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक शानदार खेळी खेळली. त्याने ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ८३ धावा केल्या आहेत. या सामन्यात रिंकू सिंहने नाबाद ५ धावांची खेळी केली.(AFP)
(8 / 8)
केकेआर सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबी सहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या, राजस्थान तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानावर आहे.(AFP)