मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल आला आहे. बुमराहच्या नावावर आता १३ सामन्यांत २० विकेट्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हर्षल पटेलने २० बळी घेतले असले तरी चांगल्या सरासरीमुळे जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर आहे.
त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीच्या नावावर १२ सामन्यात १८ विकेट्स आहेत.
चौथ्या क्रमांकावर असलेल्या हर्षित राणाने १० सामन्यांत २०.७५ च्या सरासरीने १६ बळी घेतले आहेत. तसेच पाचव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्जच्या अर्शदीप सिंगनेही १६ विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर पर्पल कॅपच्या यादीतील उर्वरित गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, सुनील नरेन, टी नटराजन, आंद्रे रसेल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने १२ सामन्यात ७०.४४ च्या सरासरीने ६३४ धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने १२ सामन्यांत ५४.१० च्या सरासरीने ५४१ धावा केल्या आहेत.
हे फलंदाजही जबरदस्त फॉर्मात - विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या स्थानावर आहे. ट्रॅव्हिस हेडने ११ सामन्यांत ५३.३० च्या सरासरीने ५३३ धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. त्याच्या नावावर १२ सामन्यांत ५२७ धावा आहेत.