भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात विराट कोहलीने ६६ कोटींचा कर भरला आहे. शाहरुख खान, थलापति विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. क्रिकेटव्यतिरिक्त कोहलीकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीनंतर एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि हार्दिक पंड्या या यादीत टॉप-५ मध्ये आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्माचे नाव नाही.
एमएस धोनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात विराट कोहलीनंतर सर्वाधिक ३८ कोटी रुपये कर भरला आहे. सचिन तेंडुलकरने २८ कोटी, सौरव गांगुलीने २३ कोटी आणि हार्दिक पांड्याने १३ कोटी रुपये कर भरला आहे.
ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर- २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर किंग खान ९२ कोटींसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दाक्षिणात्य अभिनेता थलापति विजय ८० कोटी रुपये कर भरत दुसऱ्या, तर सलमान खान ७५ कोटी रुपये कर भरत तिसऱ्या स्थानावर आहे. अमिताभ बच्चन ७१ कोटी रुपयांसह चौथ्या स्थानावर आहेत.
सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी -
(१) शाहरुख खान - ९२ कोटी,
(२) थलापति विजय - ८० कोटी,
(३) सलमान खान - ७५ कोटी,
(४) अमिताभ बच्चन - ७१ कोटी ,
(५) विराट कोहली - ६६ कोटी,
(६) अजय देवगण - ४२ कोटी,
(७) एमएस धोनी - ३८ कोटी,
(८) सचिन तेंडुलकर - २८ कोटी,
(९) हृतिक रोशन - २८ कोटी,
(१०) कपिल शर्मा - २६ कोटी,
(११) सौरव गांगुली - २३ कोटी,
(१२) करीना कपूर - २० कोटी,
(१३) शाहिद कपूर – १४ कोटी,
(१४) मोहनलाल – १४ कोटी,
(१५) अल्लू अर्जुन – १४ कोटी,
(१६) हार्दिक पांड्या – १३ कोटी,
(१७) कियारा अडवाणी – १२ कोटी,
(१८) कतरिना कैफ – ११ कोटी,
(१९) पंकज त्रिपाठी – ११ कोटी,
(२०) आमिर खान – १० कोटी,
(२१) ऋषभ पंत –१० कोटी