टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. जयपूरयेथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या विराटने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लिंगरला मागे टाकले. विराटने टी-२० कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केले आहे.
विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७२ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या डावात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्ट्राईक रेट १५६.९४ . पण आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात संथ शतक आहे. त्याने ६७ चेंडूत शतक झळकावले.
ख्रिस गेल सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या २२ आहे. ४६३ सामन्यांत (४५५ डाव) त्याने २२ शतके आणि ८८ अर्धशतके झळकावली. टी-२० क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १७५ आहे.
विराटच्या आधी पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू टी-२०मध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत आहे. त्याने २९० सामन्यात (२८०डाव) ११ शतके झळकावली. त्याची सरासरी ४४.२८ आहे. आणि स्ट्राईक रेट १२९.३२ आहे. आणि एकूण अर्धशतकांची संख्या ८७ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२२ इतकी आहे.