विराट कोहली आणि अनुष्का शर्माने अलिबागमध्ये नवीन घर घेतले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, आता या आलीशान घराचा गृहप्रवेश कार्यक्रम लवकरच होऊ शकतो.
इन्स्टंट बॉलीवूडच्या एका बातमीनुसार, कोहली आणि अनुष्का हाऊस वॉर्मिंगची तयारी करत आहेत. हार, फुलांसह अनेक वस्तू त्यांच्या नवीन घरात पोहोचवल्या जात आहेत.
कोहली-अनुष्काचा नवीन बंगला अतिशय खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. यात जवळपास सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीच्या या बंगल्याची किंमत २० कोटींहून अधिक आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
कोहलीच्या नव्या बंगल्यात स्विमिंग आणि जिमही आहे. दरम्यान, नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून परतला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कोहली आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे आणि आपल्या नवीन घराच्या कार्यक्रमाची तयारीही करत आहे.
दरम्यान, विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा काही खास नव्हता. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारतात पोहोचताच विराट कोहली प्रेमानंद महाराजांना भेटायला गेला होता.