वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?-virat kohli 3 massive world records in t20 cricket first indian to score 100 fifties after 2 ipl 2024 games for rcb jra ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?

वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?

वर्ल्डकप खेळायचा असेल तर स्ट्राईक रेटवर काम करावं लागेल, कोहलीची संथ खेळी आरसीबीला महागात पडली?

Mar 30, 2024 01:18 PM IST
  • twitter
  • twitter
  • Virat Kohli RCB VS KKR, IPL 2024: आयपीएल २०२४ च्या १०व्या सामन्यात कोलकाताने बंगळुरूचा ७ विकेट्सनी पराभव केला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शुक्रवारी (२९ मार्च) झालेल्या सामन्यात केकेआरला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य त्यांनी १६.१ षटकात पूर्ण केले.
आरसीबीकडून या सामन्यात विराट कोहलीने ५९ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. किंग कोहलीने चिन्नास्वामीच्या मैदानावर ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विराटने १४०.६८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. 
share
(1 / 7)
आरसीबीकडून या सामन्यात विराट कोहलीने ५९ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. किंग कोहलीने चिन्नास्वामीच्या मैदानावर ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विराटने १४०.६८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. (AFP)
आता तुम्ही म्हणाल की कोहलीने एक टोक धरून जबाबदार खेळी खेळली. पण कधी कधी क्रिकेटच्या खेळात स्कोअर बोर्ड सर्वच सत्य सांगत नाही तर सामन्याची परिस्थितीवरून सर्वकाही समजून घ्यावे लागते.
share
(2 / 7)
आता तुम्ही म्हणाल की कोहलीने एक टोक धरून जबाबदार खेळी खेळली. पण कधी कधी क्रिकेटच्या खेळात स्कोअर बोर्ड सर्वच सत्य सांगत नाही तर सामन्याची परिस्थितीवरून सर्वकाही समजून घ्यावे लागते.(AFP)
डावाच्या शेवटच्या ५ षटकांमध्ये, जेव्हा फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारायला हवे होते, तेव्हा विराट वाईटरित्या संघर्ष करताना दिसला. शेवटच्या २१ चेंडूंमध्ये कोहलीच्या बॅटमधून एकच चौकार आला आणि तोही शेवटच्या षटकात.
share
(3 / 7)
डावाच्या शेवटच्या ५ षटकांमध्ये, जेव्हा फलंदाजांनी भरपूर चौकार आणि षटकार मारायला हवे होते, तेव्हा विराट वाईटरित्या संघर्ष करताना दिसला. शेवटच्या २१ चेंडूंमध्ये कोहलीच्या बॅटमधून एकच चौकार आला आणि तोही शेवटच्या षटकात.(PTI)
कोहलीची संथ खेळी महागात पडली? - सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावत विराट कोहलीने आणखी एक दमदार खेळी खेळली यात शंका नाही. किंग कोहलीने वेगवान सुरुवातही केली होती. मात्र, जसजसा डाव पुढे सरकत गेला तसतसा कोहलीचा वेगही कमी होत गेला.
share
(4 / 7)

विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये, विराटने खेळलेल्या शेवटच्या १६ चेंडूत केवळ २१ धावा केल्या. होय, फक्त २१ धावा. यावेळी किंग कोहली आपल्या होम ग्राऊंडवर आणि फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या मैदानावर चौकारांसाठी धडपडताना दिसला. विराटची अवस्था इतकी बिकट होती की त्याला या १६ चेंडूत फक्त एकच षटकार मारता आला.
share
(5 / 7)
विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये, विराटने खेळलेल्या शेवटच्या १६ चेंडूत केवळ २१ धावा केल्या. होय, फक्त २१ धावा. यावेळी किंग कोहली आपल्या होम ग्राऊंडवर आणि फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या मैदानावर चौकारांसाठी धडपडताना दिसला. विराटची अवस्था इतकी बिकट होती की त्याला या १६ चेंडूत फक्त एकच षटकार मारता आला.(PTI)
निवडकर्त्यांची कोहलीवर नजर- जर कोहलीने शेवटची षटके सुरुवातीसारखी त्याच गतीने खेळली असती तर आरसीबीच्या स्कोअर बोर्डवर २०० पेक्षा जास्त धावा झाल्या असत्या. आरसीबीच्या पराभवासाठी फक्त कोहलीच्या या खेळीला दोष देणे योग्य नाही, पण विराटला पॉवरप्लेनंतरच्या फलंदाजीवर आणि स्ट्राईक रेटवर  काम करावे लागेल.
share
(6 / 7)

विराटला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की २०२४ टी-20 विश्वचषक आयपीएलनंतर खेळला जाणार आहे आणि निवडकर्ते त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. विराटचा स्ट्राईक रेट काही प्रमाणात सुधारला आहे, यात शंका नाही. कोहली दमदार सुरुवातही करत आहे, पण संपूर्ण डावात तो पॉवरप्लेमधला स्ट्राइक रेट राखू शकत नाही.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज