मुंबईत नुकतेच ‘व्हिंटेंज कार रॅली’ अर्थात अतिशय जुन्या कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दक्षिण मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दरवर्षी 'व्हिंटेज कार फिएस्टा'चे आयोजन करण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनात तब्बल २०० पेक्षा जास्त रंगीबेरंगी, विविध कंपन्यांच्या जुन्या कार तसेच बाइक्सचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
(Vijay Gohil)या प्रदर्शनात जगातील लोकप्रिय आणि महागड्या कार उत्पादक कंपन्यांच्या व्हिंटेज कार पहायला मिळाल्या. यात रोल्स रॉयल, मॉरिस गॅरेज, पॅकर्ड कंपन्याच्या व्हिंटेज कार होत्या. प्रदर्शनात रोल्स रॉयल कंपनीच्या २६ व्हिंटेज कार प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
(Vijay Gohil)जुन्या जमान्यातील व्हिंटेज कार जवळ बाळगणे हा छंद तसा महागडा. अशा कारच्या देखभाल दुरूस्तीवर फार खर्च करावा लागतो. अनेकांना या जुन्या, दुर्मिळ कार पाहण्याचा छंद असतो. अशा शौकिनांनी व्हिंटेज कार पाहण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मोठी गर्दी केली होती. पुढील वर्षीच्या प्रदर्शनात आणखी २५ दुर्मिळ रोल्स रॉयस कार सामील केल्या जातील, अशी माहिती आयोजक नितीन दोस्सा यांनी दिली.
(PTI)व्हिंटेज कार प्रदर्शनात १०० व्हिंटेज बाइक्स प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. जुन्या काळातील मजबूत, दणकट बाइक्सचा यात समावेश होता. आताच्या सुपरबाइकच्या जमान्यात व्हिंटेज बाइक्स पाहताना दुचाकी निर्मितीतील जुने तंत्रज्ञान, बाइक्सचे विविध भाग, त्याचा आकार याची भव्यता यातून दिसून येत होती.
(PTI)भारतात सर्वाधिक व्हिंटेज कार या उद्योगपती पुणे स्थित योहान पुनावाला यांच्याकडे आहेत. त्यानंतर उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्याकडे व्हिंटेज कार्सचे मोठे कलेक्शन आहे. या दोघांनीही आपल्याकडील बहुतांश कार येथील प्रदर्शनात मांडल्या होत्या. शिवाय यशोवर्धन रुईया यांच्या मालकीच्या पाच रोल्स रॉयस कार प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
(PTI)