विनेश फोगट सेमी फायनलमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनचा धुव्वा उडवला, १० सेकंदात संपूर्ण गेम फिरवला, पाहा-vinesh phogat paris 2024 olympics beat world champion yui susaki in womens 50kg round of 16 ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  विनेश फोगट सेमी फायनलमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनचा धुव्वा उडवला, १० सेकंदात संपूर्ण गेम फिरवला, पाहा

विनेश फोगट सेमी फायनलमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनचा धुव्वा उडवला, १० सेकंदात संपूर्ण गेम फिरवला, पाहा

Aug 06, 2024 05:39 PM IST
  • twitter
  • twitter
  • भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने आज (६ ऑगस्ट) महिलांच्या ५० किलो गटातील पहिल्या फेरीत विश्वविजेत्या युई सुसाकी हिचा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या प्री-क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. पहिल्या प्री क्वार्टर फायनल फेरीत तिने ५० किलो वजनी गटात सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा विश्वविजेती युई सुसाकी हिचा ३-२ असा पराभव केला. या सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती युई सुसाकी प्रथम आघाडीवर होती, परंतु शेवटच्या १० सेकंदात विनेशने बाजी मारली.
share
(1 / 5)

यानंतर विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युक्रेनच्या माजी विश्वविजेत्या ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. आता विनेशचा उपांत्य फेरीचा सामना आज (६ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजता होणार आहे.
share
(2 / 5)

यातील सर्वात विशेष बाब म्हणजे, याआधी सुसाकीला तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाही पराभवाचा सामना करावा लागला नव्हता, असे मानले जात होते की विनेशला पहिली फेरी पार करणे कठीण होईल, कारण ती अशा जपानी खेळाडूशी स्पर्धा करत होती, जिने टोकियो ऑलिम्पिक गेम्समध्ये एकही गुण न गमावता सुवर्णपदक जिंकले होते. पण विनेशने अप्रतिम धाडस दाखवत संपूर्ण सामना फिरवला.
share
(3 / 5)

विनेश फोगटची आतापर्यंतची कामगिरी- जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेती असलेली विनेश इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे, परंतु ऑलिम्पिक खेळांमधील तिची कामगिरी निराशाजनक आहे.
share
(4 / 5)

विनेश तिचे तिसरे ऑलिम्पिक खेळत आहे, पण ५० किलोमध्ये ती प्रथमच खेळत आहे. यापूर्वी ती ५३ किलोमध्ये खेळायची. विनेशने महिलांच्या ५० किलो गटातील राउंड ऑफ १६ फेरी जिंकली आहे, आता ती सुपर-८ आणि सेमीफायनलही खेळणार आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज