पंचामृत :
विजया एकादशीला भगवान विष्णूला पूजेदरम्यान पंचामृत अर्पण करणे आवश्यक आहे. भगवान विष्णूंना पंचामृत अत्यंत प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. पंचामृत अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. जीवनातील दुःखाचा अंत होतो.
या उपायाने कुंडलीतील बृहस्पति दोष दूर होतो:
विजया एकादशीला भगवान विष्णूला केळी अर्पण केल्याने कुंडलीतील गुरु दोष दूर होतो. आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांना देवी लक्ष्मी आशीर्वाद देते. भगवान बृहस्पति प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
(Freepik)केशराची खीर अर्पण करा:
विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला केशर घातलेली खीरही अर्पण करावी. खीर देताना खीरसोबत तुळशीची पाने टाकायची. तुशशीशिवाय भगवान विष्णूला दिलेला कोणताही प्रसाद अपूर्ण मानला जातो.
धण्याची पंजिरी:
भगवान श्रीकृष्णाला धण्याची पंजिरीचा प्रसाद खूप आवडतो. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार मानला जातो. भगवंताला सुठड्याचा म्हणजेच धण्याची पंजिरीचा प्रसाद अर्पण केल्याने अपूर्ण मनोकामना पूर्ण होतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)