Vijay Deverakonda: नुकतीच विजयने आपल्या कुटुंबासह हैदराबादमधील घरी दसऱ्याची पूजा आयोजित केली होती. याचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(1 / 5)
साऊथ स्टार अभिनेता विजय देवरकोंडा हा सगळ्या परंपरा पाळणारा अभिनेता आहे. नुकतीच त्याने आपल्या कुटुंबासह हैदराबादमधील घरी दसऱ्याची पूजा आयोजित केली होती. याचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(2 / 5)
'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्यानेही आपल्या चाहत्यांना शुभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या. विजय देवरकोंडा यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो पांढर्या पायजम्यासह सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे.
(3 / 5)
या फोटोत त्याचा धाकटा भाऊ, अभिनेता आनंद देवरकोंडादेखील दिसला आहे. दुसऱ्या एका फोटोत विजय आणि आनंद त्यांच्या कुटुंबातील सदस्यांभोवती गप्पा मारताना दिसले आहेत.
(4 / 5)
विजय देवरकोंडाच्या घरातील महिलावर्ग सणासुदीच्या या दिवशी साड्यांमध्ये सुंदर दिसत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, विजय अखेर रोमँटिक ड्रामा चित्रपट 'कुशी'मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत दिसला होता.
(5 / 5)
विजय लवकरच परशुराम पेटला दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'फॅमिली स्टार' असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.