अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोड्यांपैकी एक आहेत. सध्या दोघेही सुट्टीचा आनंद घेत आहे. दोघेही वाळवंटात एकांतात वेळ घालवत आहेत. या दरम्यान ते चाहत्यांसह त्यांचे फोटो शेअर करताना दिसत आहेत.
नुकतेच कतरिनाने पती विकी कौशलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यात दोघांचा रोमान्स दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री कतरिना कैफ हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसली आहे.
या दुसऱ्या छायाचित्रात कतरिना कैफ तिचा नवरा विकी कौशलच्या मांडीवर बसून फोटो क्लिक करताना दिसत आहे.
कतरिना कैफ सध्या पती विकी कौशल याच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. दोघांनीही आपल्या सुट्टीचं ठिकाण जाहीर केलेलं नाही.