PHOTO: राज्य मराठी चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दिग्गजांचा सन्मान! पाहा या खास सोहळ्यातील काही क्षणचित्रे-veteran actors honored at state marathi film awards check out some snapshots from this special event ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTO: राज्य मराठी चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दिग्गजांचा सन्मान! पाहा या खास सोहळ्यातील काही क्षणचित्रे

PHOTO: राज्य मराठी चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दिग्गजांचा सन्मान! पाहा या खास सोहळ्यातील काही क्षणचित्रे

Aug 22, 2024 11:13 AM IST
  • twitter
  • twitter
State Marathi Film Awards: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडीयममध्ये पार पडला आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडीयममध्ये पार पडला आहे. यावेळी मनोरंजन विश्वातील दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यात ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या दोन ज्येष्ठ अभिनेत्यांसह अन्य कलाकारांना देखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
share
(1 / 8)

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या दिवंगत राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांना गौरविण्यात आले. त्यांना २०२३ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
share
(2 / 8)

व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना प्रदान करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम भावनिक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
share
(3 / 8)

सांस्कृतिक विभागाच्या वतीने कंठ संगीतातील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने ज्येष्ठ गायक सुदेश भोसले यांना गौरवण्यात आले.
share
(4 / 8)

दिवंगत राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक एन चंद्रा यांना गौरवण्यात आली आहे.
share
(5 / 8)

चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान या पुरस्काराने लेखक, अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना गौरविण्यात आले.
share
(6 / 8)

२०२४च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गौरविण्यात आले.
share
(7 / 8)

सोबतच २०२४चा चित्रपटांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला.
share
(8 / 8)

इतर गॅलरीज