वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धन आणि समृद्धीचा दाता व प्रेमाचा कारक शुक्र ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलतो. त्याचप्रमाणे त्याचा प्रभाव १२ राशींवर पडतो. दरम्यान, ८ मार्च रोजी शिवरात्री येण्यापूर्वी शुक्राने मार्च २०२४ मध्ये आपली स्थिती बदलली आहे.
कुंभ राशीत शुक्र प्रवेशामुळे अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. ७ मार्च रोजी सकाळी १०:३३ वाजता शुक्र ग्रह कुंभ राशीत विराजमान झाला आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे कोणत्या राशींना सुवर्ण संधी मिळतील व खास लाभ होईल जाणून घ्या.
वृषभ:
शुक्र कुंभ राशीमध्ये दहाव्या स्थानी आहे. परिणामी, अनेक राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तुमच्या सर्व कामांवर सकारात्मक परिणाम होईल. अनेक लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला कमाईच्या भरपूर संधी मिळतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. विवाहासाठी चांगला काळ आहे.
कर्क :
शुक्र या राशीत आठव्या स्थानी आहे. शिक्षणात चांगला फायदा होईल. उच्च शिक्षणात विविध स्वप्ने पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला फायदा होईल. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. उच्च पदावर असलेल्यांना लाभ मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. बचत वाढू शकते.